भारतात पहिल्यांदाच ! रोबो देत आहे गाडीची डिलिव्हरी

भारतात पहिल्यांदाच ! रोबो देत आहे गाडीची डिलिव्हरी

रोबो (Robo) च्या माध्यमातून जगभर वेगवेगळ्या प्रकारची कामे केली जात असल्याचं आपण अनेकवेळा बघितलं आहे. केरळमध्ये देखील अशाच पद्धतीने शोरूममध्ये रोबोच्या मदतीने किया सोनेट (KIA Sonet) या गाडीची डिलिव्हरी केली जात आहे.

  • Share this:

कोची, 25 नोव्हेंबर : रोबोच्या माध्यमातून जगभर वेगवेगळ्या प्रकारची कामे केली जात असल्याचं आपण अनेकवेळा बघितलं आहे. केरळमध्ये देखील अशाच पद्धतीने शोरूममध्ये रोबोच्या मदतीने किया सोनेट (KIA Sonet) या गाडीची डिलिव्हरी केली जात आहे. ह्युमन रोबो (Human Robo) च्या मदतीने याआधी कुठेही अशा पद्धतीने डिलिव्हरी झालेली नाही. सयाबोट नावाच्या या ह्युमन रोबोच्या माध्यमातून ग्राहकांना गाडीची डिलिव्हरी देण्यात येत आहे. कोची येथील असीमोव रोबोटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयकृष्णन उपस्थित असल्याने ही विशेष डिलिव्हरी करणं शक्य झालं.

ग्राहकाला ह्युमनॉइड रोबोद्वारे चावी आणि कागदपत्रे देतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. यामध्ये हा रोबो गाडीविषयी माहिती देतानाही दिसत आहे. याचबरोबर शोरूमच्या अधिकाऱ्यांनी त्याला सेवेबद्दल विचारलं असता त्याने याचे उत्तर देखील दिलं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी रोबोच्या हातात चावी दिल्यानंतर त्याने ती ग्राहकाच्या हातात देऊन डिलिव्हरी पूर्ण केली.

या वर्षीच्या सुरुवातीला लाँच झाल्यानंतर किया सोनेटला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. या गाडीचे बेस मॉडेल 6.8 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. कियाच्या या कारमध्ये इंजिनांचे तीन ऑप्शन मिळणार आहेत. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन जास्तीत जास्त 82 बीएचपीची शक्ती आणि 115 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन, जास्तीत जास्त 118 बीएचपीची शक्ती आणि 172 पिक टॉर्क जनरेट करतं. एनएम 1.5 लिटर डिझेल इंजिन दोन ट्यूनमध्ये देण्यात आले आहे. टेक लाइन व्हेरिएन्टमध्ये जास्तीत जास्त 99 बीएचपी ताकद प्रदान करतं तर टॉप एन्ड GTX मॉडेल मधील इंजिन 113 बीएचपी ताकद प्रदान करतं.

या गाडीला मोठी मागणी असून दर 3 मिनिटांना 2 गाड्यांचं बुकिंग होत असल्याचं उत्पादनकर्त्यांनी सांगितलं आहे. सेलटॉस या मॉडेलच्या माध्यमातून किया मोटर्सने भारतात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. भारतात BS6 इंजिनांचा वापर वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांदरम्यान भारतात आल्याने या गाडीला मोठी पसंती मिळाली होती.

केरळमध्ये रोबो वापरण्याची परंपरा सुरु होऊन बराच काळ लोटला आहे. कोरोनाच्या या कालखंडातदेखील रोबोने सेवा बजावली, त्यामुळे केरळच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात मदत झाली होती. कोरोनाच्या काळात कोरोना योद्धे आणि अधिकारी म्हणून रोबोचा वापर करण्यात आला होता. त्याचबरोबर रेस्टॉरंटमध्येदेखील रोबोचा वापर करण्यात येत आहे.

Published by: Shreyas
First published: November 25, 2020, 4:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading