मुंबई, 20 डिसेंबर : कोरोना काळात अनेकांकडून ऑनलाईन व्यवहाराचा (online transaction) मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे सायबर फ्रॉड (Cyber Fraud), ऑनलाईन फसवणूकीचं प्रमाणही वेगात वाढत आहे. कोरोनानंतर आता सायबर गुन्हात मोठी वाढ झाली आहे. पोलिसांसमोर दरदिवशी अशा अनेक आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान असतं. पण अनेकदा सायबर फ्रॉड प्रकरणात आपणच जबाबदार ठरतो. एखाद्या चुकीच्या लिंकवर, फ्रॉड साईटवर जाऊन केलेल्या शॉपिंग किंवा इतर काही गोष्टींमुळे फ्रॉडला बळी पडतो. परंतु काही अशा टिप्स आहेत, ज्याने सायबर फ्रॉडपासून स्वत:ला सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं.
- अनेक मोबाईल कंपन्या आपल्या हँडसेटची सिक्योरिटी वाढवण्यासाठी नवे अपडेट्स पाठवत असतात. आपला फोन सिक्योर करण्यासाठी कंपनीकडून अधिकृतरित्या आलेले अपडेट फॉलो करून ते अपडेट (Security Update) ठेवणं फायद्याचं ठरतं. त्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये सॉफ्टवेअर अपडेट्स चेक करू शकता.
- हॅकिंगपासून वाचण्यासाठी आपल्या ब्रॉडब्रँड राउटरमध्ये असणाऱ्या यूनिवर्स प्लग अँड प्लेला (UPnP) नेहमी बंद ठेवा. ज्यावेळी गरज असेल, त्याचवेळी ओपन करा. UPnP च्या मदतीने कोणताही आउटसायडर आपल्या नेटवर्कमध्ये सहजपणे कनेक्ट होऊ शकतो. हॅकिंगसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं समोर आलं आहे.
- चांगल्या ब्रँडचा स्मार्टफोन म्हणजे महागच, हे समिकरण चुकीचं आहे. सॅमसंग आणि एलजीसारखे ब्रँडही बजेटमध्ये असणारे चांगले मोबाईल बाजारात आणत आहेत. चांगल्या ब्रँडच्या स्मार्टफोनचं एक वैशिष्ट्य म्हणजे, या फोनचे सिक्योरिटी अपडेट वेळोवेळी येत असतात. यामुळे फोन हॅक होण्याची शक्यता कमी होते.
- घरी ब्रॉडब्रँडचा वापर करताना, त्याच्या WiFi पासवर्डकडे खास लक्ष ठेवा. वाय-फायचा पासवर्ड सेट करताना, त्यात तुमच्या नावाच्या वापर करू नका. सायबर फ्रॉड करणारे, सर्वात आधी तुमच्या नावाचात वापर करुन फसवणूक, हॅकिंग (Hack) करण्याचा प्रयत्न करतात.
- मोबाईलचा पासवर्ड स्ट्रॉंग ठेवणं, सुरक्षेची सर्वात मूलभूत प्रणाली आहे. मोबाईलमध्ये कमीत कमी आठ कॅरेक्टर्सचा पासवर्ड टाकल्यास, हॅकर्सला तो क्रॅक करणं कठीण जातं. पासवर्ड सेट करताना नेहमी नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर्सचा वापर करा.