जिओ फायबर : देशभर मोफत कॉल, फक्त 500 रुपयांत अनलिमिटेड इंटरनॅशनल कॉल

जिओ फायबर : देशभर मोफत कॉल, फक्त 500 रुपयांत अनलिमिटेड इंटरनॅशनल कॉल

रिलायन्स समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ फायबरची घोषणा केली.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : रिलायन्स समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ फायबरची घोषणा केली. 5 सप्टेंबरला ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. जिओ फायबरचे प्लॅन 100 एमबीपीएस पासून सुरू होणार आहे. हे बेसिक प्लॅन असतील. प्लॅननुसार एक जीबीपीएस पर्यंत याचे स्पीड मिळेल. जिओ फायबरचा मोठा फायदा असेल तो म्हणजे यावरून देशभरात कायमस्वरूपी कुठेही फ्री कॉल करता येतील. हा प्लॅन कमीत कमी 700 रुपयांपासून आहे. त्याचसोबत अनलिमिटेड इंटरनॅशनल कॉलसाठी 500 रुपयांचा स्वतंत्र प्लॅन आहे. ग्राहकांना फक्त डेटा प्लॅनचे पैसे मोजावे लागतील.

देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या 42व्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की जिओचे 34 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झालेत. सब्सक्राइबर, नफा आणि रिव्हेन्यूच्या आधारावर जिओ जगातली सर्वात मोठी टेलिकाॅम कंपनी झालीय. भारताच्या अर्थव्यवस्थेत रिलायन्सचं महत्त्वाचं योगदान आहे. 2019च्या आर्थिक वर्षात आरआयएल सर्वात नफा देणारी कंपनी ठरलीय. मुकेश अंबानी म्हणाले या वर्षात कंपनीला जास्त फायदा झालाय. मुकेश अंबानी यांनी GigaFiber सुरू करण्याची घोषणा केली. हे सेट टाॅप बाॅक्स मोफत मिळणार आहेत. ग्राहकांना 4 ते टेलिव्हिजनसह हे सेट बाॅक्स मोफत मिळतील.

जिओ फायबरसाठी 15 मिलियन नोंदणी झालीय. ते म्हणाले, आम्ही होम ब्राॅडबँड सर्विस, एन्टरप्राइजेस ब्राॅडब्रँड सर्विस, SME साठी ब्राॅडब्रँड सर्विस आणि इंटरनेट ऑफ थिंग्सवर फोकस करू. जिओमधल्या गुंतवणुकीचा काळ संपला. आम्ही आता जिओला नव्या उंचीवर घेऊन जाऊ.

AGM मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2020पर्यंत 5 लाख कोटी डाॅलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य ठेवलंय. मला वाटतं, भारत हे लक्ष्य सहज साध्य करू शकेल. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. ते पुढे म्हणाले, RIL सर्वात मोठी कर भरणारी कंपनी बनलीय. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीनं 67320 कोटी रुपये GST दिलं होतं. तर 12191 कोटी इन्कम टॅक्स भरला होता.

ग्राऊंड रिपोर्ट: पाणी ओसरल्यानंतर रस्त्यांवर चिखलामुळे दलदल, पाहा महापुराची दाहकता LIVE

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 12:37 PM IST

ताज्या बातम्या