'हे' अ‍ॅप्लिकेशन करणार विसरलेल्या वस्तूंची आठवण

'हे' अ‍ॅप्लिकेशन करणार विसरलेल्या वस्तूंची आठवण

या बॉक्ससोबत जोडलेली एखादी वस्तू तुम्ही कुठेही विसरलात किंवा तुमच्याकडून ती वस्तू हरवली, तर स्मार्टफोनमध्ये असलेला हा बॉक्स तुम्हाला त्या वस्तूची आठवण करून देईल किंवा शोधण्यास मदत करेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : घरातून निघताना किंवा ऑफिसमधून निघताना आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी विसरू नये, यासाठी फ्रेंच स्टार्टअप आयडी लिंकने एक उपाय शोधून काढला आहे. यामध्ये RFID लेबल्सशी कनेक्ट केलेला एक बॉक्स असणार आहे, जो आपल्या पाकिट किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांशी आणि वस्तूंशी जोडलेला असेल. या बॉक्ससोबत जोडलेली एखादी वस्तू तुम्ही कुठेही विसरलात किंवा तुमच्याकडून ती वस्तू हरवली, तर स्मार्टफोनमध्ये असलेला हा बॉक्स तुम्हाला त्या वस्तूची आठवण करून देईल किंवा शोधण्यास मदत करेल.

सध्याच्या काळात हे उपकरण सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. या किटमागील स्टार्टअप सध्या किकस्टारर्टर या क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मवरून निधी गोळा करत आहे.

सध्या जिथे सामान्य ट्रॅकर्स वस्तू शोधण्यास मदत करतात. तिथेच '& मोई' (&Moi) नावाची ही सिस्टम आपल्याला आपण सांगून ठेवलेल्या वस्तू जसं पिशव्या, कागदपत्रं शोधायला मदत करेल.

वाचा - आता ATM प्रमाणे होणार तुमचं आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

RFID टॅग हे इलेक्ट्रॉनिक मायक्रोचिप्सशी संबधित ॲंटेनासारखं काम करतात. जे रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे एखाद्या वस्तूची ओळख पटवून देण्यासाठी मदत करतात. हे अतिशय छोट्या आकाराचं असून स्वस्त दरांत उपलब्ध आहेत. तसंच याला बॅटरीची आवश्यकता नाही.

आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेलं हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला पाकिट, यूएसबी की, बस पास किंवा औषधांच पॅकेट यासारख्या गोष्टी स्मार्टफोन डिजिटली जोडण्यास मदत करते. यापैकी कुठलीही गोष्ट चोरीला गेली किंवा आपल्याकडून हरवली तर हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला त्याची आठवण करून देते. हा बॉक्स ब्लूटूथद्वारे फोनशी कनेक्ट असणार आहे. ज्यामुळे एखादी गोष्ट आपण विसरलो तर लगेचच आपल्या फोनवर याचं नोटिफिकेशन येईल.

वाचा - 'या' खास नंबरने असा मिळवा चोरी झालेला फोन

हा बॉक्स आणि त्याचे RFID स्टिकर्स हे केवळ Crowdfunding Website किकस्टारर्टरवर विकले जातात. त्याची किंमत 180 युरो आहे, ज्यात तुम्हाला 10 RFID टॅग मिळतात. चार वर्षांच्या संशोधन आणि विकासानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये '& मोई' आपल्या भेटीला येणार आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 12, 2020, 4:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या