हा AC कपड्यांसोबत घाला आणि राहा गारेगार, स्मार्टफोनपेक्षाही आहे छोटा

हा AC कपड्यांसोबत घाला आणि राहा गारेगार, स्मार्टफोनपेक्षाही आहे छोटा

आपल्याकडे चांगला पाऊस पडतोय पण तरीही पाऊस थांबला की वातावरणातला उष्मा जाणवू लागतो. बऱ्याच ठिकाणी तर तापमान खाली यायचं नावच घेत नाहीये. त्यामुळे बाहेर पडलं की कधी एकदा एसीमध्ये येतो, असं वाटायला लागतं. पण आता गारेगार वाटण्यासाठी एक हायटेक उपाय आला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : आपल्याकडे चांगला पाऊस पडतोय पण तरीही पाऊस थांबला की वातावरणातला उष्मा जाणवू लागतो. बऱ्याच ठिकाणी तर तापमान खाली यायचं नावच घेत नाहीये. त्यामुळे बाहेर पडलं की कधी एकदा एसीमध्ये येतो, असं वाटायला लागतं. पण आता गारेगार वाटण्यासाठी एक हायटेक उपाय आला आहे.

सोनी कंपनीने एक असा एसी काढला आहे जो आपण कपड्यांसोबत घालू शकतो. या पोर्टेबल एसीचं नाव आहे, रिऑन पॉकेट. या एसीमुळे कपड्यांमध्ये गारवा जाणवतो. रिऑन पॉकेट या एसीचं वजन फार नाही. तो कोणत्याही मोबाइल फोनपेक्षा हलकाच आहे.हा एसी बॅटरीवर चालतो आणि ब्लू टूथच्या माध्यमातून मोबाइलशी कनेक्ट करता येतो. दोन तास चार्जिंग केलं तर तो 90 मिनिटं चालू शकतो.

(हेही वाचा : रेड वाईन घेतल्याने हा आजार होतो दूर, अमेरिकेतल्या संशोधकांचा दावा )

पॉकेट साइजचं हे उपकरण छोट्या बॅगमध्येही मावतं किंवा पाठीवर आणि गळ्याजवळही आपण घालू शकतो. यामध्ये एक एलिमेंट असेल. ते थंड किंवा गरम करता येईल. अशी एलिमेंट्स जास्त करून कारमध्ये किंवा वाईन कूलरमध्ये वापरली जातात. यासाठी कमी ऊर्जा लागते.

असं असलं तरी या एसीसाठी विशिष्ट प्रकारची अंडरगारमेंट्स घालावी लागतील. अशी अंडगारमेंट्स स्मॉल, मीडियम आणि लार्ज साइजमध्ये उपलब्ध असतील. आत्तातरी हे कपडे फक्त पुरुषांसाठीच आहेत.

सोनी रिऑनची किंमत 8 हजार 990 रुपये आहे. त्याचबरोबर जर या एसीसाठी कपडे घ्यायचे असतील तर त्याची किंमत 12 हजार रुपये आहे. सध्या हा एसी जपानमध्ये उपलब्ध आहे पण भारतात 2020 मध्ये तो येऊ शकेल.

====================================================================================================

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: July 27, 2019, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading