मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Jio ची धमाकेदार ऑफर, 200 रुपयाहून कमी किमतीत मिळतोय 1000 GB डेटा, पाहा काय आहे प्लॅन

Jio ची धमाकेदार ऑफर, 200 रुपयाहून कमी किमतीत मिळतोय 1000 GB डेटा, पाहा काय आहे प्लॅन

JioFiber वर युजर्स केवळ 250 रुपयात तब्बल 1000 GB म्हणजे 1 TB डेटा मिळवू शकतात. या ऑफरसाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 जुलै : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ब्रॉडबँड यूनिट, जिओ फायबरकडे (JioFiber) आपल्या युजर्ससाठी अतिशय जबरदस्त ऑफर्स आहेत. याद्वारे अधिक डेटा उपलब्ध करुन दिला जातो. आता जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली असून यात JioFiber वर युजर्स केवळ 250 रुपयात तब्बल 1000 GB म्हणजे 1 TB डेटा मिळवू शकतात. या ऑफरसाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे

JioFiber युजर्सला केवळ 199 रुपयांत 1 TB डेटा दिला जात आहे. ही किंमत टॅक्स वगळता आहे. म्हणजेच या किमतीवर वेगळा टॅक्सदेखील द्वावा लागतो. JioFiber चा हा प्लॅन 1000 GB डेटा केवळ सात दिवसांसाठी उपलब्ध आहे. यावर युजर्सला फेयर युजेस पॉलिसी अर्थात FUP डेटा मिळाल्यानंतर 100 mbps स्पीड मिळतो. FUP क्रॉस झाल्यानंतर स्पीड कमी होऊन 1 mbps होतो. या प्लॅनसह फ्री व्हॉईस कॉलिंग ऑफर असून सात दिवसांपर्यंत ती वैध आहे. सर्व टॅक्स मिळून या ऑफरसाठी जवळपास 234.82 रुपये भरावे लागतील.

(वाचा - UIDAI Alert! Aadhaar कार्डच्या या फ्रॉडपासून सावधान, अशी होतेय फसवणूक)

महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हा 1TB डेटा ऑफर एक डेटा सॅशे आहे. JioFiber युजर म्हणून याची खरेदी करता येऊ शकते. इतका डेटा सात दिवसांत न संपल्यास, तो पुढील डेटामध्ये जोडला जात नाही. एअरटेल, बीएसएनएल सारख्या इतर कोणत्याही इंटरनेट प्रोव्हाइडरकडे असा डेटा प्लॅन नाही.

(वाचा - रिंग वाजण्याआधीच समजेल कोण करतंय कॉल? जाणून घ्या या स्मार्ट ट्रिकबाबत)

तसंच, JioFiber चे ट्रायल प्लॅन्सही आहेत. एक 1500 रुपये आणि दुसरा 2500 रुपये आहे. दोन्ही प्लॅनमध्ये 150 mbps स्पीड मिळतो. 2500 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही ओटीटी लाभही मिळतात.

First published:

Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet