Home /News /technology /

Reliance Jio लवकरच लाँच करणार 8000 हून कमी किंमतीतील 4G स्मार्टफोन

Reliance Jio लवकरच लाँच करणार 8000 हून कमी किंमतीतील 4G स्मार्टफोन

8 हजार रुपये किंवा 8 हजारहून कमी किंमतीत हे रिलायन्स जिओ 4G स्मार्टफोन बाजारात आणण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनसह OTT प्लॅटफॉर्मचा फ्री ऍक्सेस, डिस्काउंट्स, वन टाईम स्क्रिन रिप्लेसमेंट, शॉपिंग बेनिफिट्ससारख्या ऑफर्सही देणार आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या 4G फीचर फोन युजर्सला स्मार्टफोनमध्ये मायग्रेट करण्याची तयारी करत आहे. त्याशिवाय कंपनी वोडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल सारख्या कंपन्यांच्या 2G युजर्सलाही आपल्याकडे आकर्षित करू पाहत आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ लवकरच देशात स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोच्या पार्टनरशिपमध्ये जिओ एक्सक्लूसिव्ह स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनसह OTT प्लॅटफॉर्मचा फ्री ऍक्सेस, डिस्काउंट्स, वन टाईम स्क्रिन रिप्लेसमेंट, शॉपिंग बेनिफिट्ससारख्या ऑफर्सही देणार आहे. Reliance Jio लवकरच लाँच करणार 4G स्मार्टफोन - रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ कार्बन, लावा यांसारख्या लोकल मॅन्युफॅक्चररसह काही चीनी ब्रँड्ससह याबाबत चर्चा करत आहे. 8 हजार रुपये किंवा 8 हजारहून कमी किंमतीत हे रिलायन्स जिओ 4G स्मार्टफोन बाजारात आणण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. (वाचा - स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!) याआधी मिळालेल्या माहितीनुसार, जिओने iTel सह भागीदारी केल्याची चर्चा होती. चीनी स्मार्टफोन निर्मात्यांसह, जिओ देशभरात 3 हजार ते 4 हजार रुपयांदरम्यान स्मार्टफोन लाँच करेल. अद्याप हे हँडसेट भारतात लाँच करण्यात आलेले नाही. जिओ आपल्या JioPhone सीरीजसाठी Flex सह काम करत असून Google सोबत भागीदारीमध्ये लो-कॉस्ट 4G डिव्हाईस लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओच्या या निर्णयामुळे कंपनीला ग्रॉस सब्सक्रायबर्स वाढवण्यासाठी मदत होईल. देशात 350 मिलियनहून अधिक फीचर फोन युजर्स आहेत आणि हा आकडा अतिशय मोठा आहे. हेच कारण आहे की, जिओकडे लॉ-कॉस्ट स्मार्टफोन लाँच करुन सब्सक्रायबर्स वाढवण्याची संधी आहे. (वाचा - गाड्यांच्या रजिस्ट्रेशन ट्रान्सफर नियमांमध्ये होणार हे मोठे बदल) रिपोर्टनुसार, भारती एअरटेलही (Airtel) लावा (Lava), विवो (Vivo) आणि कार्बनसारख्या (Karbonn) स्मार्टफोन कंपन्यांसह लॉ-कॉस्ट 4G स्मार्टफोन आणण्याबाबत चर्चा करत आहे. त्यामुळे आता या येणाऱ्या काळात कोणती टेलिकॉम कंपनी या शर्यतीत बाजी मारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Reliance, Reliance Jio, Smartphone

    पुढील बातम्या