जिओची प्रजासत्ताक दिनाची आॅफर, डेटा मिळेल दिवसाला 1.5 जीबी !

जिओची प्रजासत्ताक दिनाची आॅफर, डेटा मिळेल दिवसाला 1.5 जीबी !

रिलायन्स जिओनं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांसाठी खास आॅफर घेऊन आलंय.

  • Share this:

23 जानेवारी : रिलायन्स जिओनं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांसाठी खास आॅफर घेऊन आलंय. 26 जानेवारीपासून जिओ आपल्या ग्राहकांना प्रतिदिवस 1.5 जीबी इंटरनेट डेटा देणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जिओने 98 रुपयांच्या प्लॅन हा 28 दिवसांचा केला आहे. सध्या हा प्लॅन 14 दिवसांचा आहे. या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा मिळणार आहे.

तसंच सर्वच प्लॅनवर दिवसाला एक जीबीचा डेटा मिळतोय. पण 26 जानेवारीपासून ग्राहकांना प्रतिदिवस सर्वच प्लॅनवर 1.5 जीबी डेटा मिळणार आहे.

त्याचबरोबर 199 प्लॅन हा आता 149 रुपयांत मिळणार आहे. या प्रमाणेच 399 चा 349, 459 चा 399 आणि 509 चा प्लॅनमध्ये 449 रुपयांमध्ये मिळणार आहे.

First published: January 23, 2018, 11:28 PM IST

ताज्या बातम्या