लॉकडाऊनमध्ये 3 महिन्यांसाठी Jio कडून 999 रुपयांचा प्लॅन, मिळणार 'हे' फायदे

लॉकडाऊनमध्ये 3 महिन्यांसाठी Jio कडून 999 रुपयांचा प्लॅन, मिळणार 'हे' फायदे

work from home करणाऱ्यांसाठी जिओकडून तीन महिन्यांचा बेस्ट प्लॅन लाँच.

  • Share this:

मुंबई, 15 मे : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने वोडाफोन आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी लॉकडाऊनमध्ये काही खास प्लॅन आणले आहेत. Work from home करणाऱ्यांसाठी हा प्लॅन फार फायदेशीर आहे असं जिओकडून सांगण्यात आलं आहे. याआधी Work From home करणाऱ्या ग्राहकांसाठी 2,399 रुपयांचा प्लॅन आणला होता.

999 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय आहे खास

Reliance Jio 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक खास सुविधा मिळणार आहेत. 3 GB रोज डेटासह 3 महिन्यांची वैधता मिळणार आहे. जे लोक Work from home करतात त्यांना हा प्लान फायदेशीर ठरणार आहे. 28 दिवसांना 350 रुपयांचा रिचार्ज कऱण्यापेक्षा 999 चा प्लॅन फायदेशीर ठरतो. या शिवाय या प्लॅनमध्ये Jio ते jio ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. इतर नेटवर्कसाठी 3000 मिनिटं आणि 100 SMS दरदिवशी मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता 84 दिवस असणार आहे.

एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे अनुक्रमा 2398 आणि 2399 वार्षिक प्लॅन आहेत. त्यामध्ये दररोज दीड जीबी इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस मिळतात. त्या तुलनेत जिओच्या वार्षिक प्लॅनमध्ये 2399 रुपयांत 365 दिवस दररोज 2 जीबी डेटा ऑफर केला आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉल आणि SMS सुद्धा मिळणार आहेत. जिओने आणखी एक वार्षिक प्लॅन दिला आहे. 2121 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी दररोज दीड जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह एसएमएस सुविधा मिळणार आहे.

हे वाचा-बंपर डिस्काउंट! 62 हजारांचा फोन फक्त 22,999 रुपयांमध्ये, ऑफर फक्त एक दिवस

डेली डेटा संपल्यानंतर अॅड ऑन पॅकही जिओने ऑफर केले आहेत. यामध्ये आधीपासूनच 11 ते 51 रुपयांपर्यंत आणि 301 रुपयांचा पॅक उपलब्ध आहे. त्यात आता नवीन डेटा अॅड ऑन पॅक देण्यात आले आहेत. 151, 201 आणि 251 रुपयांचे प्लॅन असून यावर अनुक्रमे 30, 40 आणि 50 जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटाची वैधता आधीच्या प्लॅननुसार असणार आहे.

हे वाचा-काय टेक्नॉलॉजी आहे! शरीरावर फक्त टॅटू लावून मेंदूत काय चालतंय ते समजणार

हे वाचा-WhatsApp वर मिळणार सर्वात मोठं फीचर, ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी ठरणार महत्वाचं

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 15, 2020, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading