Jio च्या ग्राहकांना मोठा दिलासा, कंपनीने घेतला हा निर्णय!

Jio च्या ग्राहकांना मोठा दिलासा, कंपनीने घेतला हा निर्णय!

रिलायन्स जिओनं फ्रि आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता आणखी एक निर्णय घेत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : रिलायन्स जिओने Jio 9 ऑक्टोबरपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. दरम्यान, ग्राहकांसाठी दिलासा देणारा निर्णय जिओनं घेतला आहे.

जिओच्या ज्या ग्राहकांनी 9 ऑक्टोबर किंवा त्याआधी रिचार्ज केला असेल तर तो ग्राहक रिचार्ज प्लॅन संपेपर्यंत जिओव्यतिरिक्त इतर कंपन्यांनादेखील फ्री कॉल करू शकतो. सध्याचा प्लॅन संपल्यानंतर मात्र पैसे मोजावे लागतील. रिलायन्स जिओने याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. Jio जिओ फोनवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी हे पैसे पडणार आहेत. रिलायन्स जिओची सेवा आता पूर्णपणे मोफत मिळणार नसल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC)ग्राहकांकडून वसून करण्यासाठी धोरणामध्ये हा बदल करण्यात आला आहे.

कंपनीने ग्राहकांना आययुसी चार्ज लावला तरी याचा फारसा परिणाम पडणार नाही. कारण रिलायन्सने जो टॉपअप यासाठी दिला आहे त्यातही फ्री डेटा दिला आहे. याच्या आधारे इतर नेटवर्कच्या ग्राहकांशी चर्चा करता येणार आहे. टॉपअपमध्ये 10 रुपयांवर 1 जीबी, 20 रुपयांवर 2 जीबी तर 50 रुपयांवर 5 जीबी डेटा फ्री देण्यात येणार आहे.

IUC चार्ज म्हणजे काय?

- इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क.

- देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आग्रही आहे.

- TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे.

- गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत.

- IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आहे. त्यानुसार प्राधिकरणाने सर्व मोबाईल कंपन्यांना सूचनाही केल्या आहेत.

- IUC पूर्ण रद्द करण्याची शेवटची मुदत 1 जानेवारी 2020 आहे. त्याअगोदर हे दर बंद होणं अपेक्षित आहे.

- Jio ने दिलेल्या माहितीनुसार, आउटगोइंग कॉल्सला लावलं जाणारं शुल्क हे IUC मुळे आहे. त्यामुळे IUC बंद होईल त्यादिवशी पुन्हा एकदा जिओचे सर्व कॉल्स फ्री होतील.

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

First published: October 11, 2019, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading