मराठी Android युजरसाठी Jioनं दिली 'ही' खास भेट, इंटरनेट वापरणं होणार सोपं

रिलायन्स जिओनं नुकतंच इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी एक नवीन ब्राऊजर लाँच केलं आहे. याचा फायदा मराठी भाषेतील अॅण्ड्रॉईड युजरला होणार आहे.

  • Share this:

रिलायन्स जिओनं अॅण्ड्रॉइड युजरसाठी नवीन ब्राऊजर अॅप लाँच केलं आहे. या ब्राऊजरचं नाव Jio Browser App असं ठेवण्यात आलं आहे. सध्या भरपूर ब्राऊजर अॅप उपलब्ध असल्यामुळे जिओच्या या अॅपचं वैशिष्ट्यं काय ते जाणून घ्या.

जिओचं हे अॅप्लिकेशन फक्त अॅण्ड्रॉइड युजरसाठी लाँच केलं आहे. यासाठी जिओ कंपनीचं नेट वापरणं बंधनकारक नाही म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे अॅण्ड्रॉइड युजर जिओचं नवीन ब्राऊजर अॅप वापरू शकतं.

रिलायन्सने भारतातील अॅण्ड्रॉइड युजर्सना लक्षात घेऊन जिओचं ब्राऊजर अॅप तयार केलं आहे. हिंदीसोबत मराठी, गुजराती, तामिळ, तेलगु, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेमध्ये जिओचं ब्राऊजर अॅप्लिकेशन असल्यामुळे इंटरनेट वापरता भाषेचा अडथळा येणार नाही. अॅण्ड्रॉइड युजर सेटिंगमध्ये जाऊन आपल्या सोयीनुसार भाषा बदलू शकतात.

Jio browser अॅपचं साईज फक्त 4.8 MB ठेवण्यात आलं आहे. अॅप चालू करताच तुमच्या होम पेजवर राजकीय, मनोरंजन, स्पोर्टस आणि टेक्नोलॉजीच्या सर्व बातम्या मिळतील. या व्यतिरीक्त ब्राऊजरमध्ये न्यूज अपडेटसाठी एक व्हिडिओ सेक्शन दिलं आहे.

ब्राऊजरमध्ये स्थानिक बातम्यांची कॅटगरीसुद्धा दिली आहे. यावर क्लिक केल्यानं तुमच्या आसपासच्या घटनांची माहिती तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युजरसाठी प्रायव्हेट ब्राऊसिंग सुविधाही देण्यात आली आहे. इतर अॅपप्रमाणे बुकमार्क किंवा लिंक सोशल मीडियावर शेअर करता येणार आहे.

जिओच्या ब्राऊजरमध्ये वाईस इनपुटदेखील सपोर्ट करणारं आहे. त्यामुळे या ब्राऊजरमध्ये वॉईस रेकॉर्ड करून तुम्हाला सर्च करता येणार आहे. त्याचबरोबर यामध्ये टेक्टचं साईज निवडण्याचा पर्याय या अॅपमध्ये देण्यात आला आहे. सध्या हे ब्राऊजर फक्त अॅण्ड्रॉइड फोनसाठी देण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या