Jio चा दिवाळी धमाका, All-in-One प्लॅन आधीपेक्षा मिळणार स्वस्त

जिओने ऑल इन वन प्लॅन लाँच केला असून सध्या असलेल्या प्लॅनपेक्षा स्वस्त रिचार्ज आणि जास्त फायदे दिले आहेत.

  • Share this:

रिलायन्स जिओने सोमवारी नवीन ऑल इन वन प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये युजर्सना आधीपेक्षा जास्त डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळणार आहेत. जिओने तीन नवीन प्लॅन सुरू केले आहेत. यामध्ये 222, 333, 444 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

सर्वात स्वस्त असलेल्या 222 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2जीबी डेटा आणि जिओ टू जिओ नेटवर्क अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तर जिओवरून इतर कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1 हजार मिनिट मिळतील.

ऑल इन वन प्लॅनमध्ये 333 रुपयांतसुद्धा तेच फायदे मिळतील जे 222 रुपयांत मिळतात. त्यामध्ये एक महिन्याऐवजी दोन महिने मुदत असणार आहे. तर 444 रुपयांच्या प्लॅनवर युजर्सला तीन महिन्याची मुदत मिळेल. तीनपैकी कोणताही रिचार्ज मारल्यानंतर त्याची मुदत वाढवण्यासाठी 111 रुपयांचा रिचार्ज आहे. यामुळे एक महिना मुदत वाढेल.

जिओचा नवा प्लॅन जुन्या दीड जीबी प्लॅनचा अपग्रेड आहे. यामध्ये जास्त डेटासोबत 1000 मिनिट इतर नेटवर्कसाठी  मिळणार आहेत. युजर्सना यासाठी वेगळा रिचार्ज करायचा असेल तर 80 रुपये लागतात.

नवीन प्लॅन हा जुन्या प्लॅनच्या तुलनेत स्वस्त आहे. सध्या 2 जीबी डेटाचा तीन महिन्यासाठीचा प्लॅन 448 रुपये आहे. त्याऐवजी 444 रुपयात इतर नेटवर्कवर 1000 मिनिट टॉक टाइम मिळणार आहे. तर 2 महिन्यासाठी याआधी 396 रुपयांचा प्लॅन होता त्याच्या इतकाच फायदा 222 रुपयांत मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 10:17 AM IST

ताज्या बातम्या