जिओची 'धन धना धन' आॅफर, तीन महिने मिळणार मोफत डेटा

जिओची 'धन धना धन' आॅफर, तीन महिने मिळणार मोफत डेटा

धन धना धन प्लॅननुसार ग्राहकांना दररोज 1 जीबीचा डेटा मिळणार आहे. तर 509 रुपयांचं रिचार्ज केल्यास दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे

  • Share this:

11 एप्रिल : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक अफलातून आॅफर लाँच केली आहे. 'धन धना धन' आॅफरची घोषणा रिलायन्सने केली आहे. या आॅफरमध्ये 309 रुपयांचं रिचार्ज केल्यास तीन महिने अनलिमिडेट डेटा मिळणार आहे.

समर आॅफर मागे घेतल्यानंतर रिलायन्सने ग्राहकांसाठी नवी आॅफर दिलीये. 'धन धना धन' असं या प्लॅनचं नाव असून याची मंगळवारी संध्याकाळी घोषणा करण्यात आलीये. या आॅफरमध्ये 309 रुपयांचं रिचार्ज करणं बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही जिओ प्राईम मेंबर झाला नसाल तर तुम्हाला या आॅफरसाठी 99 रुपये मेंबरशिपचे आणि आॅफरचे 309 रुपये असे एकूण 408 रुपये मोजावे लागणार आहे. तसंच या प्लॅनमध्ये 509 रुपयांचा प्लॅन पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलाय.

धन धना धन प्लॅननुसार ग्राहकांना दररोज 1 जीबीचा डेटा मिळणार आहे. तर 509 रुपयांचं रिचार्ज केल्यास दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. सोबतच तीन महिन्यांसाठी एसएमएस आणि जिओ अॅप्स सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.

ही आॅफर फक्त पहिले रिचार्ज करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. ही आॅफर समर सरप्राईज आॅफरसोबत पात्र नसणार आहे.

हा प्लॅन अॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही 15 पर्यंत रिचार्ज करू शकतात. कारण 15 एप्रिलनंतर जिओ प्राईम मेंबरशिप संपणार आहे.

जिओच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार,प्राईम सब्सक्राइबर्सवर 209 रुपयांच्या रिचार्जवर 84 जीबी डेटा मिळणार आहे. याची मर्यादा 84 दिवसांपर्यंत आहे. तर 509 रुपयांचं रिचार्ज केल्यास 84 दिवसांसाठी 168 जीबी डेटा मिळणार आहे.

First published: April 11, 2017, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading