नवी दिल्ली, 26 मार्च : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Jio) ग्राहकांसाठी नेहमीच धमाकेदार ऑफर्स जाहीर करते. कंपनी ग्राहकांना चांगल्या रिचार्ज प्लॅनसह, ग्राहकांच्या सुरक्षेसाठीही ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी लोकांना जागरुक करत असते. परंतु कंपनीच्या अनेक प्रयत्नांनंतरही हॅकर्सकडून युजर्सची फसवणूक होते. त्यासाठी आता जिओने आपल्या सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
कंपनीने आपल्या सर्व ग्राहकांना मेसेज पाठवून अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. तसंच कोणत्याही संशयास्पद कॉल आणि मेसेजला उत्तर न देण्याचाही सल्ला दिला आहे. कंपनीने सांगितलं की, KYC किंवा मोफत मोबाईल डेटा देणारे मेसेज आणि कॉलपासून सावध राहा आणि अशा कॉल-मेसेजवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. फसवणूक करणाऱ्यांकडून यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं.
जिओने आपल्या ग्राहाकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिलंय की, फसवणूकीच्या हेतूने पाठवलेल्या कोणत्याही मेसेजपासून सावध राहा ज्यात तुमची वैयक्तिक माहिती, केवायसी डिटेल्स अपडेट करण्यासाठी सांगितलं जात असेल किंवा मोफत मोबाईल डेटा देण्याचा मेसेज पाठवण्यात आला असेल. अज्ञात, संशायस्पद नंबरवरुन कॉल करणाऱ्यांना तुमची वैयक्तिक माहिती कधीही देऊ नका. सुरक्षित राहा, असं जिओकडून सांगण्यात आलं आहे.
अशा मेसेज, कॉलवर जर प्रतिक्रिया दिली, तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. हॅकर्स या मेसेजेसच्या मदतीने तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहिती काढून घेतात. पर्सनल माहिती मिळाल्यानंतर तुमचा डेटा हॅक होण्याचा धोका असतो आणि त्यानंतर बँक अकाउंट खाली होऊन मोठा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा मेसेज, कॉलवर प्रतिक्रिया न देण्याचं सांगितलं जात आहे.
तुमच्या नंबरवर असं अॅक्टिवेट करा DND -
Jio आपल्या ग्राहकांना अशा फेक मेसेज आणि कॉलपासून वाचवण्यासाठी डू नॉट डिस्टर्ब अशी सुविधा देतं, जी सहजपणे अॅक्टिवेट करता येते. ही सुविधा अॅक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला MyJio अॅपच्या डाव्या बाजूला कॉर्नरला दिलेल्या आयकॉनवर टॅप करून सेटिंग्जमध्ये जावं लागेल. त्यानंतर DND ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर कंपनीकडून एक मेसेज येईल आणि 7 दिवसांमध्ये तुमच्या नंबरवर DND अॅक्टिवेट होईल.
त्याशिवाय कस्टमर केअरला कॉल करुनही DND अॅक्टिवेट करता येऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online fraud, Reliance Jio, Reliance Jio Internet, Tech news