नवी दिल्ली, 24 एप्रिल : देशातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्ससाठी अनेक ऑफर्स जारी करत असते. जिओने आपल्या युजर्ससाठी अनेक प्रीपेड प्लॅन आणले आहेत. ज्यात ग्राहक आपल्या गरजेनुसार, हवा तो प्लॅन घेऊ शकतात. परंतु अधिक प्लॅन्स असल्याने अनेकदा लोकांमध्ये सर्वात चांगला प्लॅन कोणता हे शोधणं कठिण होतं. रिलायन्स जिओचा एक असा खास प्लॅन आहे, ज्यात केवळ 1 रुपया अधिक देऊन 28 दिवसांची वॅलिडिटी आणि 56 GB अधिक डेटा मिळवता येतो.
काय आहे प्लॅनमध्ये फरक -
1 रुपयाचा फरक असणाऱ्या या प्लॅनमध्ये डेटा आणि वॅलिडिटीचा फरक आहे. 598 रुपयांच्या प्लॅनसह 56 दिवसांची वॅलिडिटी आहे. तर 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी आहे. अशाप्रकारे केवळ एक रुपया एक्स्ट्रा देऊन 28 दिवसांची अधिकची वॅलिडिटी मिळते.
598 रुपयांच्या प्लॅनमध्ये 112 GB डेटा मिळतो, तर 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 168 GB डेटा मिळतो.
Jio चा 598 रुपयांचा प्लॅन -
598 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. संपूर्ण प्लॅनमध्ये 112 GB हाय स्पीड डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर, याचा स्पीड कमी होऊन 64kbps होतो. या प्लॅनसह फ्री कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याशिवाय जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शनही मिळतं. तसंच या प्लॅनमध्ये कोणत्याही एक्स्ट्रा चार्जशिवाय एक वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टार सब्सक्रिप्शनही फ्रीमध्ये मिळतं. या प्लनची वॅलिडिटी 56 दिवसांची आहे.
599 प्लॅन -
जिओच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्येही दररोज 2GB डेटा मिळतो. यात एकूण 168 GB डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याशिवाय जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळतं. या प्लनची वॅलिडिटी 84 दिवसांची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.