Home /News /technology /

Online सह ऑफलाईन मार्केटमध्ये उतरण्यासाठी Reliance चं मोठं पाउल, तुम्हाला असा होणार फायदा

Online सह ऑफलाईन मार्केटमध्ये उतरण्यासाठी Reliance चं मोठं पाउल, तुम्हाला असा होणार फायदा

स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ऑनलाईन बाजारपेठेवर वर्चस्व असणाऱ्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स आपलं जिओ डिजिटल मार्ट घेऊन येत आहे.

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : भारतीय ग्राहकाच्या दैनंदिन आयुष्यातील जवळपास प्रत्येक गरजेसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली उत्पादनं उपलब्ध दिली आहेत. रिलायन्सने 2016 मध्ये जिओच्या माध्यमातून टेलिकॉम उद्योगात (Telecom Industry) पाऊल ठेवलं आणि या व्यवसायातल्या बड्या कंपन्यांना दणका दिला. टेलिकॉम उद्योगात जायंट म्हणून रिलायन्स जिओचं (Reliance Jio) नाव आहे. आपल्या पद्धतीने आणि आपल्या अटींवर व्यवसाय करायचा या विचारांनी प्रेरित रिलायन्स आता जिओ मार्ट डिजिटलच्या माध्यमातून ऑनलाईन मोबाईल उद्योगातील जायंट अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर द्यायला सज्ज झालं आहे. 'द केन' ने दिलेल्या वृत्तानुसार, 2020 च्या आकडेवारीनुसार रिलायन्स जिओ मार्ट (Reliance Jio Mart) या ई-ग्रोसरी व्यवसायाकडून दिवसाला 5 लाख ऑर्डर्स पूर्ण केल्या जातात. त्या तुलनेत स्पर्धक बिग बास्केट केवळ 2 लाख 83 हजार ऑर्डर्स दिवसाला पूर्ण करतो. रिलायन्स जिओ मार्टने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं आहे. देशातलं सर्वांत मोठं फॅशन पोर्टल Walmart च्या Myntra लाही Reliance चं Ajıo हे फॅशन पोर्टल जोरदार टक्कर देत आहे. आता स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ऑनलाईन बाजारपेठेवर वर्चस्व असणाऱ्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स आपलं जिओ डिजिटल मार्ट (Reliance Digital Mart) घेऊन येत आहे. गुगलसोबत जिओने जिओफोन (Google Jio Phone) विकसित केला असून हा फोन सप्टेंबर 2021 मध्ये लाँच होणार असल्याची घोषणा रिलायन्सच्या AGM मध्ये करण्यात आली होती. जिओफोन सीरिजमधील जिओफोन 2 ची 100 मिलियन युनिट्स रिलायन्सने विकली असून 300 मिलियन फोन विकायचं त्यांचं उदिद्ष्ट आहे. नव्या जिओ फोनची सर्वांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ऑफलाईन विक्रीसाठी 8000 हून अधिक रिटेल स्टोअर्सच्या चेनचा वापर करून घेण्याचा रिलायन्सचा विचार असून या e-commerce क्षेत्रात आपलं B2B अस्तित्व कंपनी निर्माण करणार आहे, असं ‘द केन’च्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या काही दशकांमध्ये अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांनी जगातल्या नावजलेल्या स्मार्टफोन कंपन्यांशी करार करून त्यांचे फोन विकले आहेत. त्यामुळे भारतातल्या ऑनलाईन स्मार्टफोन विक्रीत त्यांचा वाटा 30 ते 40 टक्के आहे.

केवळ 4 रुपयांत करा 100 किमीचा प्रवास, जाणून घ्या या भन्नाट Electric Cycle बाबत

अशी आहे तयारी जिओ स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीसाठी रिलायन्स ऑफलाईन व्यवसाय सज्ज झाला असून, देशातील 700 शहरांत असणाऱ्या 8 हजार 200 जिओ स्टोअर आणि 500 रिलायन्स डिजिटल आउटलेट्समध्येही ही उत्पादनं आता ग्राहकांना मिळू शकतील. याचबरोबर रिलायन्स रिचार्ज सेवा देणाऱ्या 2 लाख 50 हजार दुकानांमध्येही हे फोन्स आणि वस्तू उपलब्ध होतील. मार्च 2020 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेल्सच्या एकूण महसुलात रिलायन्स कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स नेटवर्कचा वाटा 60 टक्के आहे. त्यामुळे हे नेटवर्क कंपनीच्या नव्या प्रयत्नांना बळ देणार आहे. रिलायन्सच्या ई-कॉमर्स एक्झिक्युटिव्हनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल उत्पादकांशी बोलणी करताना कंपनीचं ऑफलाईन नेटवर्क खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे कारण या नेटवर्कच्या बळावरच फोनची विक्री वाढेल. सिंगापूरमधील कॅनालेज या रिसर्च फर्मचे अनॅलिस्ट संयम चौरसिया म्हणाले, ‘पहिल्यांदा फोन घेणारे ऑफलाईन मार्केटमधूनच फोन विकत घेतात, त्यामुळे येत्या काही वर्षांत भारतीय स्मार्टफोन बाजाराला ड्राइव्ह करायचं काम ऑफलाईन मार्केटच करणार आहे.’ ऑनलाईन आणि ऑफलाईनचा ताळमेळ - रिलायन्स अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारखंच आपला ऑनलाईन प्रेझेन्सही बळकट करणार आहे. तंत्रज्ञानासोबतच आपल्या रिटेल आउटलेटची शक्ती वापरून आपला व्यवसाय वाढवण्याचा म्हणजेच B2C आणि B2B या दोन्ही घटकांचा योग्य मेळ घालण्याचा विचार रिलायन्सचा आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ मार्टचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवे जिओफोन तुम्हाला जिओ मार्टवर ऑनलाईन उपलब्ध असतीलच त्याचबरोबर ते ऑफलाईन सर्व रिलायन्स स्टोअरमध्येही मिळतील.

तुमच्या शहरात LPG Gas Cylinder चा नवा दर काय? घरबसल्या सोप्या पद्धतीने असं तपासा

प्रत्येक कंपनीचं ऑफलाईन नेटवर्क - मोबाईल कंपन्यांनीही आपलं ऑफलाईन नेटवर्क उभारलं आहे. सॅमसंग कंपनीकडून दर तिमाहीला 40 हजार स्टोर्स आणि 1 लाख 20 हजार रिटेलर्स उत्पादनं खरेदी करतात. कंपनी थेट रिटेलर्सना फोन विकत नाही त्यांचंही एक वेगळं नेटवर्क आहे. शाओमी, वनप्लस सुरुवातीला केवळ ऑनलाईन फोन विकायचे पण आता या कंपन्यांनीही ऑफलाईन नेटवर्कस उभारली आहेत. रियलमीचे भारत आणि युरोप क्षेत्राचे उपाध्यक्ष आणि सीईओ माधव सेठ म्हणाले, ‘सगळे रिटेलर्स कंपनीपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला डिस्ट्रिब्युटर्सचं नेटवर्क हवं जे आर्थिक गुंतवणूक करून रिटेलर्सना क्रेडिट देऊ शकतील. पण भारतीय बाजारपेठेत ग्राहकापर्यंत स्वस्तात फोन पोहोचवणंही गरजेचं आहे. त्यात हे नेटवर्क फायद्याचं ठरतं.’ सर्वच स्मार्टफोन कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ऑनलाईन व्यवसायासोबत ऑफलाईन नेटवर्कचा वापर करत आहेत. 'रिलायन्स आपल्या B2B जिओ मार्टच्या माध्यमातून स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणार आहे. रिलायन्स डिजिटलच्या 500 स्टोअर्सची साखळीही यासाठी मदत करेल.' अशी माहिती रिलायन्स एक्झिक्युटिव्हनी दिली आहे. रिलायन्स आता आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन नेटवर्कचा वापर करून देशभरात स्मार्टफोन विक्री करून आपला शेअर वाढवणार आहे.
First published:

Tags: Reliance Industries, Reliance Jio

पुढील बातम्या