जिओचा मोठा निर्णय! ठराविक आउटगोइंग कॉल्ससाठी आता मोजावे लागतील पैसे

जिओचा मोठा निर्णय! ठराविक आउटगोइंग कॉल्ससाठी आता मोजावे लागतील पैसे

फ्री कॉलिंगची सुविधा दिल्यामुळे देशभरात मोबाईल क्रांती आणणाऱ्या Rilance Jio रिलायन्स जिओने त्यांच्या धोरणात मोठा बदल केला आहे. Jio जिओ फोनवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी आता पैसे पडणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 9 ऑक्टोबर  : फ्री कॉलिंगची सुविधा दिल्यामुळे देशभरात मोबाईल क्रांती आणणाऱ्या Rilance Jio रिलायन्स जिओने त्यांच्या धोरणात मोठा बदल केला आहे. Jio जिओ फोनवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी आता पैसे पडणार आहेत. रिलायन्स जिओची सेवा आता पूर्णपणे मोफत मिळणार नसल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC)ग्राहकांकडून वसून करण्यासाठी धोरणामध्ये हा बदल करण्यात आला आहे. इतर मोबाईल नेटवर्कवर कॉल करण्यासाठी जिओच्या ग्राहकांना आता 6 पैसे मिनीट दर लागणार आहे. गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत. आता एवढं मोठं नुकसान टाळण्यासाठी जिओने दुसऱ्या मोबाईल नेटवर्कवरचं IUफ्री कॉलिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच (बुधवार, 9 ऑक्टोबर)हे नवे दर लागू होणार आहेत.

जिओच्या वतीने त्यांच्या ग्राहकांना आश्वस्त करण्यासाठी असंही सांगण्यात आलं आहे की, हे आउटगोइंग चार्जेस तात्पुरते आहेत. IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा नियम सांगतो.पण अन्य मोबाईल कंपन्यांनी हे चार्जेस बंद केलेले नाहीत.

वाचा - मंदीचं अजब वास्तव! नॅनो 9 महिन्यात 1 तर मर्सिडीजची विक्री मात्र एका दिवसात 200

त्यामुळे त्याचा भुर्दंड जिओला बसत असल्याचं कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. Jio नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि 2G नेटवर्क असल्याने अन्य मोबाईल कंपन्यांचे ग्राहक  जिओ ग्राहकांना मिस्ड कॉल देतात आणि जिओवरून मग फुकट कॉल केला जातो, असं जिओचं म्हणणं आहे. Airtel आणि Vodafone-Idea चे 35 ते 40 कोटी 2G ग्राहक रिलायन्स जिओ नेटवर्कवर दररोज किमान 25 ते 30 कोटी missed call देतात, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. इतर कंपन्यांना जिओ यासाठी 13500 कोटी रुपये मोजत आहे.

वाचा - Amazon, Flipkartसह ई कॉमर्स कंपन्यांनी 6 दिवसांत विकलं 21 हजार कोटींचं सामान

जिओ ग्राहकांना केलेलं (Jio to Jio free) कॉलिंग मात्र पूर्वीसारखं मोफत असणार आहे. आउटगोइंगवरचे 6 पैसे प्रतिमिनिट हे शुल्क तात्पुरत्या स्वरूपाचं आहे, हे स्पष्ट करताना जिओने सांगितलं की, TRAI ने सांगितलेली टर्मिनेशन चार्जेस व्यवस्था लागू होत नाही, तोवर हे शुल्क लागेल. 1 जानेवारी 2020 पासून हे IUC बंद होणार असल्याची माहिती आहे.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 9, 2019, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading