JIO ने फ्री कॉलिंगसंदर्भात केली आणखी एक मोठी घोषणा; ग्राहकांना दिलासा

JIO ने फ्री कॉलिंगसंदर्भात केली आणखी एक मोठी घोषणा; ग्राहकांना दिलासा

जिओचे फ्री कॉलिंग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर Reliance Jio ने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 9 ऑक्टोबरपूर्वी तुम्ही जिओ रिचार्ज केलं असेल तर हे आधी वाचा..

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : जिओचे फ्री कॉलिंग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर Reliance Jio ने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. जिओच्या कार्डवर 9 ऑक्टोबरपूर्वी रिचार्ज केला आहे, ते त्यांचा रिचार्ज संपेपर्यंत नॉन जिओ युजर्सनादेखील फ्री कॉल (free calling)करू शकतात. हा रिचार्ज (IUC recharge) संपल्यानंतर मात्र जिओच्या ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कच्या (non jio) मोबाईलवर संपर्क साधण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. रिसायन्सने ट्वीट करून ही माहिती दिली.

जिओने गुरुवारी फ्री कॉलिंगसंदर्भातल्या त्यांच्या धोरणात मोठा बदल केला आणि 6 पैसे प्रतिमिनिट शुल्क आकारणं सुरू केलं. जिओ नंबरवरून दुसऱ्या कुठल्या मोबाईल नेटवर्कच्या नंबरला कॉल करण्यासाठी हे शुल्क आकारलं जाणार आहे.

संबंधित - IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

Jio जिओ फोनवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी  हे पैसे पडणार आहेत.  रिलायन्स जिओची सेवा आता पूर्णपणे मोफत मिळणार नसल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC)ग्राहकांकडून वसून करण्यासाठी धोरणामध्ये हा बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Paytm वापरणाऱ्यांना झटका, या निर्णयामुळे ग्राहकांचं होणार नुकसान

Jio नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि 2G नेटवर्क असल्याने अन्य मोबाईल कंपन्यांचे ग्राहक जिओ ग्राहकांना मिस्ड कॉल देतात आणि जिओवरून मग फुकट कॉल केला जातो, असं जिओचं म्हणणं आहे. Airtel आणि Vodafone-Idea चे 35 ते 40 कोटी 2G ग्राहक रिलायन्स जिओ नेटवर्कवर दररोज किमान 25 ते 30 कोटी missed call देतात, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. इतर कंपन्यांना जिओ यासाठी 13500 कोटी रुपये मोजत आहे.जिओ ग्राहकांना केलेलं (Jio to Jio free) कॉलिंग मात्र पूर्वीसारखं मोफत असणार आहे. आउटगोइंगवरचे 6 पैसे प्रतिमिनिट हे शुल्क तात्पुरत्या स्वरूपाचं आहे, हे स्पष्ट करताना जिओने सांगितलं की, TRAI ने सांगितलेली टर्मिनेशन चार्जेस व्यवस्था लागू होत नाही, तोवर हे शुल्क लागेल. 1 जानेवारी 2020 पासून हे IUC बंद होणार असल्याची माहिती आहे.

1 जानेवारीपर्यंत 'हे' काम केलं नाही, तर तुम्हाला बँकेतून काढता येणार नाही रक्कम

10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे.

---------------------------------------------------

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा LIVE VIDEO

First published: October 11, 2019, 7:11 PM IST
Tags: JIOmobile

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading