Redmi Note7 चा सेल सुरू; दुप्पट डेटा आणि 2400 रुपयांचा कॅशबॅकचा असा मिळवा फायदा

Redmi Note7 चा सेल सुरू; दुप्पट डेटा आणि 2400 रुपयांचा कॅशबॅकचा असा मिळवा फायदा

शाओमीचा नुकताच लाँच झालेला रेडमी नोट 7 आजपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून या फोनची पहिली विक्री दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्री सुरू झाली आहे. ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर जिओ कंपनीच्या खास ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 6 मार्च : शाओमीचा नुकताच लाँच झालेला रेडमी नोट 7 आजपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून या फोनची पहिली विक्री दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्री सुरू झाली आहे. ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर जिओ कंपनीच्या खास ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. जिओ 398 च्या रिचार्जवर ग्राहकांना दुप्पट डेटा मिळणार आहे. ज्यात 70 दिवसांत रोज 4GB डेटा वापरता येणार आहे. तसेच 1592 रुपयांचा डबल डेटा प्लॅन 280 दिवसांसाठी असणार आहे. तर 299 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 2400 रुपयांची कॅशबॅक व्हाऊचर्स मिळणार आहेत. याशिवाय 198 च्या रिचार्जवरही डबल डेटा प्लॅन मिळणार आहे.

काय आहेत 'रेडमी नोट 7'ची फीचर्स

या फोनमध्ये 6.3 इंच डिस्प्ले कॉलिंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसोबत मिळेल. याशिवाय यात स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे. शाओमीने रेडमी नोट 7 दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. यात 3GB RAM32GB स्टोरेजच्या फोनची किंमत 9,999 रुपये आणि 4GB RAM64GB च्या फोनची किंमत 11,999 रुपये आहे.

रेडमी नोट 7 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे. यातील एक कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. याशिवाय सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच फोनमध्ये टाइप सी चार्जिंग 3.5 एमएम हेडफोन जॅक, फिंगरप्रिंट सेंसर सारख्या फिचर्सचा सामावेश आहे.

आज सर्वाधिक चर्चेत राहिलेले हे 5 VIDEO तुम्ही पाहिले का?

First published: March 6, 2019, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading