Home /News /technology /

108 MP कॅमेरा असलेला Redmi Note 11 Pro 5G मोबाईल भारतात 'या' तारेखेला लाँच होणार

108 MP कॅमेरा असलेला Redmi Note 11 Pro 5G मोबाईल भारतात 'या' तारेखेला लाँच होणार

Redmi Note 11 Pro 5G या फोनला 6.7 इंचाची Super AMOLED डिस्प्ले स्क्रीन आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

    मुंबई, 27 जानेवारी : स्मार्टफोनच्या जगतातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे शाओमी (Xiaomi). या कंपनीने काल, 26 जानेवारी 22 ला, आपली Redmi Note 11 ही एक स्मार्टफोन्सची नवीन सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये चार स्मार्टफोन्स असतील. Redmi Note 11, Redmi Note 11S, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro 5G हे स्मार्टफोन्स काल लाँच करण्यात आले आहेत. शाओमीने हे फोन या आधी चीनमध्ये लाँच केले आहेत. आता हे फोन जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले आहेत. तसेच पुढच्या महिन्यात, 9 फेब्रुवारी रोजी, Redmi Note 11S हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. यातील Redmi Note 11 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनला 8 GB पर्यंतची रॅम तर 128GB पर्यंतची स्टोरेज क्षमता असणार आहे. तर, Redmi Note 11 Proमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर आहे. या दोन्ही स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh इतकी आहे. ही बॅटरी 67W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. या दोन्ही फोनमध्ये 6.7-इंचाची डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. Redmi Note 11 Pro 5G स्मार्टफोन Redmi Note 11 Pro 5G या फोनबद्दल बोलायचं झालं तर, या फोनला 6.7 इंचाची Super AMOLED डिस्प्ले स्क्रीन आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनची स्क्रीन HDR10 आणि 1200 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. या नवीन स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 हे प्रोसेसर आहे. तसेच यात 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज क्षमता आहे. (भारतातील सफाई कामगारांचे सर्वात मोठे सर्वेक्षण; समोर आली धक्कादायक माहिती) Redmi Note 11 Pro 5G या फोनला एक प्रायमरी बॅक कॅमेरा आहे. हा कॅमेरा 108 MP चा असून यासोबतच मायक्रो लेन्स आणि अल्ट्रावाइड अँगल लेन्सही देण्यात आली आहे. या फोनचा फ्रंट कॅमेरा 16MPचा आहे. Redmi Note 11 Pro 5G या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh इतकी आहे. ही बॅटरी 67W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. Redmi Note 11 Pro 5G फोनमधील 6GB RAM आणि 64GB मेमरी असणाऱ्या स्मार्टफोन्सची किंमत 329 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. भारतात याची किंमत 24,600 रुपये इतकी असेल. तर, 6GB RAM, 128GB मेमरी असणाऱ्या स्मार्टफोन्सची किंमत 349 डॉलर्स आणि 8GB RAM, 128GB मेमरी असणाऱ्या मॉडेलची किंमत 379 डॉलर्स आहे.
    First published:

    पुढील बातम्या