मुंबई, 2 ऑक्टोबर : शाओमीने नुकताच Redmi 9 Prime स्मार्टफोन लॉन्च केला आहे. फोनमध्ये चांगला डिस्प्ले, बॅटरी, प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप केवळ 9999 रुपयांच्या बजेटमध्ये मिळतो आहे. रेडमीचा हा Redmi 9 Prime बजेट स्मार्टफोन आजपासून खरेदी करता येऊ शकतो. या फोनचा सेल दुपारी 12 वाजल्यापासून अमेझॉन इंडिया amazon आणि mi.com वर सुरु होणार आहे. चांगल्या फिचर्ससह हा फोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो.
Redmi 9 Prime किंमत -
या फोनच्या 4 GB रॅम आणि 64GB स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची किंमत 9999 रुपये इतकी आहे. तर याच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. हा फोन मिंट ग्रीन, स्पेस ब्लू, आणि सनराईज फ्लेयर अशा तीन रंगात उपलब्ध आहे.
Looking for a phone under ₹10,000? #Redmi9Prime might just be the PRIME choice! #PrimeTimeAllRounder
On sale today at 12 noon on https://t.co/cwYEXdVQIo, @amazonIN, Mi Home, and Retail Outlets. pic.twitter.com/jD1PiotO7X
— Redmi India (@RedmiIndia) September 25, 2020
कॅमेरा सेटअप -
फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल लेंस देण्यात आली आहे, जी 118 डिग्रीपर्यंत फिल्ड ऑफ व्यू (FoV)देते. त्याशिवाय फोनला 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी फोनला 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
रेडमी 9 प्राईम स्पेसिफिकेशन्स
- 6.53 इंची फुल डिस्प्ले IPS डिस्प्ले
- कॉर्निंग गोरिला ग्लास
- मीडियाटेक हिलीयो G80 SoC ऑक्टा-कोर प्रोसेसर
- 5,020mAh बॅटरी 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट
- 4G VoLTE, वाय-फाय 802.11ac, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, आयआर ब्लास्टर, यूएसबी टाइप-सी पोर्ट