नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : आज मोबाईल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाओमी (Xiaomi)आपला नवीन फोन रेडमी 9 (Redmi 9) आज भारतात लॉन्च करणार आहे. अॅमेझॉनवर (Amazon) या फोनसंदर्भात एक टीझर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये फोनची काही खास वैशिष्ट्ये सांगण्यात आली असून फोन अॅमेझॉनवर उपलब्ध होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. हा फोन रेडमी 9C सारखाच असणार आहे. तर या फोनला जास्त रॅम (RAM) देण्यात आला असल्याचंही सांगण्यात येत आहे.
टीझरमध्ये या फोनचे सिक्युरिटी फीचर दाखवण्यात आले आहेत. पण हे फीचर नेमके कसे असतील हे आज फोन लॉन्च झाल्यानंतरच समजू शकणार आहे. टीझरमध्ये रेडमी 9 ला डिस्प्ले किंग असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हा फोन पाहण्याचा अनुभव सर्वोत्कृष्ट असल्याचंही सांगण्यात आलं आहे. कॅमेर्याच्या बाबतीतही फोन AI Dual कॅमेर्यासह असणार आहे.
Can you guess what are the ✌️ important security features we're teasing here?#Redmi9 the #MoreRAMMoreFun device is launching at 12 noon tomorrow! https://t.co/55Npn5TGql pic.twitter.com/kegtBolZ94
— Redmi India - #Redmi9 is here! (@RedmiIndia) August 26, 2020
या फोनच्या बॅटरीबाबत बोलायचं झालं तर फोनला दीर्घकाळ टिकणारी बॅटरी दिली आहे. फोनच्या रॅमविषयी टीझरमध्ये ‘9 More RAM, More FUN’ असा उल्लेख करण्यात आला आहे. फोनवर मल्टी टास्किंग करता येतं, तसंच स्टोरेजच्या बाबतीतही फोन सगळ्यांच्या पुढे आहे. परफॉरमन्सच्या बाबतीत फोनला हायपर इंजिन गेम टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
याआधी या फोनचे काही फीचर लीक झाले होते. त्या अहवालानुसार, रेडमी 9 मध्ये 6.53 इंचाचा एचडी + डिस्प्ले, ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ जी 35 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोन 2 जीबी + 3 जीबी रॅम पर्यायासह येऊ शकतो. फोनला अँड्रॉईड 10 सह एमआययूआय 12 दिले जाऊ शकतात. कॅमेरा म्हणून यामध्ये अपर्चर एफ / 2.2 सह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि अपर्चर एफ / 2. 4 सह 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला जाऊ शकतो. पॉवरसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
Well we've got all things MORE for our Mi Fans Can you guess the screen size on the #Redmi9 Tell us in the comments below! Get ready for #MoreRAMMoreFun on 27th August Know more: https://t.co/JwKJLjvSwr pic.twitter.com/OcyM5UZJVZ
— Redmi India - #Redmi9 is here! (@RedmiIndia) August 25, 2020
सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फोनची किंमत. याबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही. पण आपण कॅमेरा आणि इतर काही वैशिष्ट्यांचा अंदाज लावला तर बजेटमध्ये असेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4 जी व्हीएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाईप-C, IR ब्लास्टर आणि एमएम ऑडिओ जॅक अशी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Xiaomi redmi