मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /jio युझर्ससाठी फायद्याची बातमी, आला कॅशबॅक प्लॅन!

jio युझर्ससाठी फायद्याची बातमी, आला कॅशबॅक प्लॅन!

नुकताच जिओने एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान सादर केला आहे. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी दिलं जात आहे

नुकताच जिओने एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान सादर केला आहे. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी दिलं जात आहे

नुकताच जिओने एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान सादर केला आहे. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी दिलं जात आहे

  मुंबई, 29 सप्टेंबर : देशात लवकरच सणासुदीचा काळ (festive season) सुरू होणार आहे. फेस्टिव्ह सीजनच्या आधीच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी (prepaid users) एक मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरवर कंपनी आपल्या निवडक रिचार्ज प्लॅनसह (recharge plan) 20 टक्के कॅशबॅक देत आहे. MyJio अॅप किंवा Jio च्या अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज केल्यानंतर हा कॅशबॅक मिळणार आहे. युझर्सच्या जिओ खात्यावर कॅशबॅक जमा होऊन भविष्यात रिचार्जसाठी तो वापरला जाईल.

  जिओची ही कॅशबॅक ऑफर फक्त तीन प्लॅनवर लागू आहे. 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर युझर्सना ही ऑफर मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची असून दररोज दोन GB हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे.

  249 रुपयांचा प्लॅन

  249 रुपयांच्या या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओकडून कॅशबॅक देण्यात येत आहे. प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळत आहे. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत.

  555 रुपयांचा प्लॅन

  555 रुपयांच्या या जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये युझर्सना 20 टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा उपलब्ध आहे. त्याची वैधता 84 दिवस आहे. यासह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत.

  599 रुपयांचा प्लॅन

  599 रुपयांच्या या प्रीपेड प्लानमध्ये 20 टक्के कॅशबॅक आहे. प्लॅनची 84 दिवसांची वैधता असून, दररोज 2 GB डेटासह तो उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 168 GB डेटा आणि 100 SMS उपलब्ध आहेत.

  वरील सर्व जिओ रिचार्ज प्लॅनसह, JioCinema, JioTV, Jio Security, Jio News आणि Jio Cloud सारख्या Jio अॅप्सचा अॅक्सेस मोफत दिला जात आहे.

  Success Story: 100 वेळा अपयशी होऊनही मानली नाही हार; जिद्दीनं झाली अब्जाधीश

  नुकताच जिओने एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान सादर केला आहे. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी दिलं जात आहे. या प्लॅनची किंमत 499 रुपयांपासून सुरू होते. प्लॅनध्ये दररोज 3 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस उपलब्ध आहेत. प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या व्यतिरिक्त, सर्वांत प्रीमियम प्लॅन 2599 रुपयांचा आहे. हा प्लॅन 365 दिवसांचा असून रोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे.

  First published:
  top videos