मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? कशी घ्याल खबरदारी?

मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? कशी घ्याल खबरदारी?

बऱ्याच वेळा मोबाइलचा स्फोट होण्याच्या घटना घडतात.मोबाइल हाताळताना स्फोट झाला तर अनेक जण जखमी झाल्याचेही प्रकार घडले आहेत. असे मोबाइल लहान मुलांच्या हातात पडले तर ते आणखीनच धोकादायक ठरतं. हे टाळण्यासाठी काय करावं याबदद्लच्या या टिप्स.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : बऱ्याच वेळा मोबाइलचा स्फोट होण्याच्या घटना घडतात.मोबाइल हाताळताना स्फोट झाला तर अनेक जण जखमी झाल्याचेही प्रकार घडले आहेत. असे मोबाइल लहान मुलांच्या हातात पडले तर ते आणखीनच धोकादायक ठरतं.मोबाइलची बॅटरी जर गरजेपेक्षा जास्त चार्ज केली तर मोबाइलचा स्फोट होऊ शकतो. बहुतांश फोनमध्ये बॅटरी जास्त चार्ज होऊ नये म्हणून व्यवस्था असते. पण तरीही फोन चार्ज करताना खबरदारी घेतली नाही तर मोबाइलचा स्फोट होऊ शकतो.

वेगाने चार्जिंग धोक्याचं

गेल्या काही काळात कंपन्यांनी वेगाने चार्ज होणारे स्मार्टफोन आणले आहेत. अशा प्रकारे वेगाने चार्ज केलेल्या फोनमध्ये जास्त एनर्जी साठवली जाते. अशा फोनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट होऊ शकतो.

मोबाइल तज्ज्ञांच्या मते, चार्जिंग करताना फोनचा वापर केला तर मोबाइल आणि बॅटरी हे दोन्हीही गरम होतं. मोबाइल चार्ज करताना स्फोट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मोबाइल चार्ज करताना त्याचा वापर करणं टाळलं पाहिजे.

मोबाइलची जुनी झालेली बॅटरी किंवा कमी दर्जाची बॅटरी वापरणंही धोकादायक ठरू शकतं.

अशी घ्या खबरदारी

1. मोबाइलचा स्फोट होऊ नये यासाठी ओरिजिनल चार्जरनेच फोन चार्ज करा.

2. चार्जिंग करताना मोबाइलचा वापर टाळा

3. फोन गरम जागी ठेवू नका.

4. फोनची बॅटरी गरजेपेक्षा जास्त वेळ चार्ज करू नका.

5. फोन गरम होईल किंवा हँग होईल अशी अॅप्स इन्स्टॉल करू नका.

6. वेगाने चार्ज होणारे फोन खरेदी करू नका.

(हेही वाचा : कचरा करणाऱ्यांना द्यावा लागणार जास्त टॅक्स, मोदी सरकारचा आहे 'हा' प्लॅन )

========================================================================================================

SPECIAL REPORT : खराखुरा फ्लाईंग हिरो, आकाशात घेतली झेप!

First published: July 27, 2019, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading