दमदार बॅटरी आणि 9000 पेक्षाही कमी किंमत, Realme C12 जाणून घ्या फीचर्स

दमदार बॅटरी आणि 9000 पेक्षाही कमी किंमत, Realme C12 जाणून घ्या फीचर्स

realme C12 मोबाईलचे काय आहेत फिचर्स आणि किंमत जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : शाओमी, व्हिवो आणि सॅमसंग ओपोला टक्कर देण्यासाठी शाओमीनं बजेटमधला आणि जास्त बॅटरीचं लाईफ असलेला फोन बाजारात आणला आहे. बऱ्याचदा आपल्याला मोबाईलची बॅटरी सारखी उतरते म्हणून सतत फोन चार्ज करावा लगतो. त्यामुळे हा स्वस्तात बजेटला परवडेल आणि बॅटरी लाइफ जास्त असेल असा फोन आज लाँच केला आहे.

रिअलमी (Realme) C12 मोबाईलमध्ये चांगली बॅटरी मिळणार आहे. या फोनची किंमत कंपनीने केवळ 8,999 रुपये एवढी ठेवली आहे. या फोनचा आज सेल असणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या ऑफर्सही मिळू शकतात. फ्लिपकार्टवरून हा फोन विकत घ्यायचा असेल तर फेडरल बँक डेबिट कार्ड वापरल्यास तर तुम्हाला त्वरित 10% सवलत मिळेल. त्यासोबतच रुपे डेबिट कार्डवरही ऑफर देण्यात येत आहेत.

हे वाचा-Kia Sonet ची प्री बुकिंग सुरू, फक्त 25 हजारात घरी घेऊन जा, ही दमदार SUV !

रियलमी C12 या मोबाईलमध्ये 6.5 फुल HD एलसीडी डिस्प्ले आणि गोरिला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. एन्ड्रॉइड 10 अपडेटसह 3 GB 32 GB व्हेरियंट उपलब्ध आहे.

कॅमेरा रियलमी C12 तीन कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. F2.2 अॅपर्चरसोबत 13 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेराही देण्यात आला आहे. निळा आणि सिल्वर अशा दोन रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 24, 2020, 1:49 PM IST

ताज्या बातम्या