नवी दिल्ली, 28 एप्रिल : रियलमी 8 5G (Realme 8 5G)हा स्मार्टफोन या आठवड्याच्या सुरुवातील लॉन्च करण्यात आला. हा देशातील सर्वात स्वस्त 5G फोनपैकी एक आहे. या फोनची सुरुवातील किंमत केवळ 14,999 रुपये होती. रियलमी 8 हा 5G स्मार्टफोन 28 एप्रिलला प्रथमच फ्लॅश सेलसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा सेल 28 एप्रिलला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट (Flipcart)आणि रिअलमी डॉट कॉमवर (Realme.com) सुरू झाला. याशिवाय युजर्स हा फोन ऑफलाईनही खरेदी करु शकतात. कमी किंमत, 18W चार्जिंग आणि 8 जीबी रॅम ही या फोनची विशेष फीचर आहेत.
रिअलमी 8 5G या फोनची बेसिक किंमत 14,999 रुपये आहे. हे मॉडेल 4 जीबी रॅम (RAM) आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. दुसऱ्या मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरोज असून त्याची किंमत 16,999 रुपये आहे. ग्राहकांसाठी हा फोन सुपरसॉनिक ब्लॅक आणि सुपरसॉनिक ब्लू या दोन रंगात उपलब्ध आहे.
या फोनसोबत काही आफर्सचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो. एचडीएफसी बॅंकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्ड ट्रान्झेक्शनवर, या फोन खरेदीवर 10 टक्के म्हणजेच 750 रुपयांची सूट मिळेल. या व्यतिरिक्त फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) कार्डावर 5 टक्के डिस्काउंट दिला जाईल.
काय आहेत स्पेसिफिकेशन्स -
रियलमी 8 या 5G फोनमध्ये 6.5 इंची एचडी+डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे, तर अस्पेक्ट रेशो 20:9 आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी ड्रॅगनटेल ग्लासचा (Dragantel Glass)वापर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड 11 वर आधारित Realme UI2.0 वर काम करतो. फोनमधील प्रोसेसर मिडीयाटेक डायमेंन्सिटी 700Socआहे. यात 8 जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबी UFS2.1 स्टोरोज देण्यात आला आहे.
ट्रिपल कॅमेरा -
या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह, 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेंसर, 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी (Selfi And Video Calling) या फोनमध्ये फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच 5000mAhची बॅटरी, 18 वॅट फास्ट चार्जिंग सह देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news