Home /News /technology /

आता तुमच्या भाषेत वापरा WhatsApp; जाणून घ्या सोपी प्रोसेस

आता तुमच्या भाषेत वापरा WhatsApp; जाणून घ्या सोपी प्रोसेस

भारतामध्ये कित्येक प्रकारच्या स्थानिक भाषा आहेत. त्यामुळे स्मार्टफोन्समधील ॲप्सही वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असणे गरजेचे ठरते.

नवी दिल्ली 05 जानेवारी : सध्या केवळ शहरांमध्येच नाही, तर अगदी खेड्या-पाड्यातही लोकांकडे स्मार्टफोन्स उपलब्ध झाले आहेत. स्मार्टफोनसोबतच अनेकांकडे व्हॉट्सॲप हे मेसेजिंग ॲपही (WhatsApp) आहे. अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणारे व्हॉट्सॲप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. मात्र हे ॲप इंग्रजीमध्ये (WhatsApp Language) उपलब्ध असल्यामुळे स्मार्टफोन असूनही कित्येक लोक याचा वापर करू शकत नाहीत. भारतामध्ये कित्येक प्रकारच्या स्थानिक भाषा आहेत. त्यामुळे स्मार्टफोन्समधील ॲप्सही वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असणे गरजेचे ठरते. विशेष म्हणजे याबाबतच्या सेटिंग्स आपल्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच उपलब्ध असतात (Smartphone language settings), मात्र त्याबाबत माहिती नसल्यामुळे आपण त्याचा वापर करत नाही. या सेटिंग्स बदलल्यानंतर केवळ व्हॉट्सॲपच नाही, तर फोनमधील सर्व ॲप्सची भाषा (Change app language) तुम्हाला हवी ती होऊ शकते. काही मिनिटात 500 रुपये कमावण्याची संधी,Smartphoneवर हे Appवापरुन करावं लागेल काम जर तुमच्याकडे अँड्रॉईड फोन असेल, तर ॲप्सची भाषा बदलण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर सर्च बारमध्ये इनपुट अँड लँग्वेज (Language & Input) हे टाईप करुन सर्च करावं लागेल. यानंतर आलेल्या पर्यायांमधून लँग्वेज अँड इनपुट हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला विविध भाषांचे (Regional languages) पर्याय समोर दिसतील. यामध्ये पंजाबी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, हिंदी अशा विविध भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत. यातून मग तुम्हाला आपली भाषा निवडायची (Select your language) आहे. अँड्रॉईड ऐवजी कायओएस (KaiOS) या सॉफ्टवेअरवर चालणारा मोबाईल जर तुमच्याकडे असेल; तरीही निराश होण्याची गरज नाही. यामध्येही कित्येक स्थानिक भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला ‘पर्सनलायझेशन’ (Select Personalisation) हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर मग तुम्ही हवी ती भाषा निवडू शकता. आयफोन असणाऱ्यांसाठी मात्र यामध्ये थोडी निराशा होऊ शकते. कारण आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीमवर इंग्रजी व्यतिरिक्त केवळ हिंदी (iOS regional language options) भाषा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला हिंदी व्यतिरिक्त दुसऱ्या स्थानिक भाषांचा पर्याय मिळत नाही. आयफोनमध्ये भाषा बदलण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन लँग्वेज हा पर्याय (iOS regional language settings) निवडावा लागेल. यानंतर केवळ हिंदीच्या पर्यायावर टॅप करून तुम्ही भाषा बदलू शकता. Smartphone मध्ये दिसणाऱ्या या लहानशा होलची मोठी भूमिका, वाचा काय आहे याचा फायदा किबोर्डची भाषा इंग्रजीच राहणार लक्षात घ्या, तुम्ही व्हॉट्सॲपची भाषा बदलली तरी किबोर्डची भाषा इंग्रजीच (Keyboard language) राहणार आहे. म्हणजे तुम्ही मेसेज टाईप करताना ते इंग्रजीतच होणार आहेत. जर तुम्हाला तुमच्या भाषेत मेसेज टाईप करायचे असतील, तर गुगलच्या प्लेस्टोअर (Play Store) वरून किंवा ॲपलच्या ॲप स्टोअर (App Store) मधून जीबोर्ड (Gboard) सारखे ॲप्स डाऊनलोड करू शकता. याच्या मदतीने तुम्ही कित्येक भारतीय भाषांमध्ये टायपिंग (Apps for regional language typing) करू शकाल. कित्येक अँड्रॉईड फोन्समध्ये जीबोर्ड आधीपासूनच दिलेले असते. आयफोन यूझर्सना मात्र ते डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Tech news, Whatsapp, WhatsApp features

पुढील बातम्या