नवी दिल्ली 31 जुलै : आजकाल सोशल मीडिया (Social Media) हा सर्वांच्याच ओळखीचा शब्द झाला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आदी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी माणसाचे आयुष्य व्यापून टाकलं आहे. इंटरनेटच्या (internet) माध्यमातून अवघ्या काही क्षणात जगभरातील कोट्यवधी लोकांशी घरबसल्या जोडलं जाण्याची संधी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी दिली आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात एकमेकांना प्रत्यक्ष भेटणं कठीण असल्यानं लोकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, माहिती देण्यासाठी विविध कारणांसाठी सोशल मीडिया अगदी महत्त्वाचं साधन ठरलं आहे. यामुळे अनेकांना आपल्या कामासाठी, कलाकौशल्य सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातली माणसंही प्रकाशात आली आहेत. अनेकांना चांगली प्रसिद्धीही मिळाली आहे. 'डिजिट डॉट इन'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अशा या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये फेसबुक (Facebook) हा सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरातले कोट्यवधी लोक याच्याशी जोडले गेले आहेत. फेसबुकवर खातं नसेल, असे फार कमी लोक असतील. दिवसेंदिवस फेसबुकशी जोडल्या जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे. जगभरातल्या प्रसिद्ध व्यक्तीदेखील फेसबुकवर आहेत. काही लोक या माध्यमाशी जोडले गेल्यावर प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आले आहेत. कारण त्यांचं काम किंवा कौशल्य अगदी सहजपणे लाखो, कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचलं. अनेकदा आपण पाहतो, की अनेक लोक आपले फोटो (Photo), लिखाण फेसबुकवर शेअर करत असतात. त्याला लाइक्स (Likes) आणि कमेंट्स (Comments) मिळतात. जितक्या लाइक्स वाढतात तितकी जास्त त्याची प्रसिद्धी होते. तुम्हीही हाच फंडा वापरून प्रसिद्धी मिळवू शकता.
तुम्ही केलेलं Search खरं की खोटं? आता Google चं देणार इशारा
याकरिता एक आकर्षक प्रोफाइल फोटो (Profile Photo) फेसबुक अकाउंटवर ठेवा. शक्यतो स्वतःचा फोटो ठेवणं महत्त्वाचं ठरतं. कारण लोक तुम्हाला ओळखून लाइक्स आणि कमेंट्स करतात. पूर्वीच्या काळी जनसंपर्क वाढवण्यासाठी लोकांना प्रत्यक्ष जाऊन भेटणं हा एक महत्त्वाचा मार्ग होता; पण आता तशी गरज वाटत नाही. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून हे सहज शक्य होतं. तुम्ही इथे स्वतःचं फेसबुक पेज (Facebook Page) बनवून स्वतःची योग्य माहिती त्यावर ठेवा. ज्यामुळे तुमचे मित्र तुम्हाला ओळखतील आणि ते तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये (Friend List) सहभागी होतील. तुमचा मित्रपरिवार जितका मोठा असेल तितक्या अधिक लाइक्स आणि कमेंट्स तुमच्या पोस्ट्सना मिळतील आणि तुम्हीही फेसबुक स्टार (Facebook Star) बनाल. तसंच तुम्हीही इतरांच्या पोस्टवर लाइक आणि कमेंट करा, तर तुम्हालाही तुमच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्स मिळतील. तुमच्या पोस्टवर आलेल्या कमेंट्सची दखल घ्या.
या काही साध्या-सोप्या युक्त्या वापरल्या, तर तुम्हीही फेसबुक स्टार होऊ शकता. हजारो, लाखो लोक तुम्हाला ओळखायला लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook, Social media