मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Twitter चं नवं फीचर, आता फेसबुकप्रमाणे वापरता येणार Emoji

Twitter चं नवं फीचर, आता फेसबुकप्रमाणे वापरता येणार Emoji

आता ट्विटरही आपल्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इमोजी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.

आता ट्विटरही आपल्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इमोजी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.

आता ट्विटरही आपल्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इमोजी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली, 1 जून : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या मेसेंजरवर इमोजी (emoji)तुमचं म्हणणं व्यक्त करायला मदत करतात. आता ट्विटरही आपल्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इमोजी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. प्रसिद्ध रिव्हर्स इंजिनीअर जेन मँचाउन वाँग यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ट्विटर अनेक स्मायली विकसित करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्विटरचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी असलेल्या लिंक्डइन, इन्स्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे इमोजीचे पर्याय आधीपासूनच उपलब्ध आहेत आणि युजर त्याचा चांगल्या पद्धतीने वापरही करतात. सध्याच्या घडीला ट्विटर अ‍ॅप आणि वेबसाइटवर युजरला केवळ हार्टचं इमोजी (Heart emoji) वापरता येतं. ते लाईक म्हणूनही गृहित धरलं जातं.

सध्या ट्विटरवर युजर डायरेक्ट मेसेजेस (DMs) म्हणजेच इनबॉक्समध्ये इमोजींचा वापर करू शकतात. वेगवेगळे इमोजी वापरून ते ‘disappearing stories’ चा वापर करू शकतात. मार्च महिन्यात ट्विटरने युजर इमोजी किती प्रमाणात वापरतात आणि डिसलाईक किंवा डाउनव्होट बटण किती वेळा वापरतात याचा सर्व्हे सुरू केला.

डिसलाईक आणि डाउनव्होट ही बटणं एकसारखीच नाहीत. Reddit वर युजर डाउनव्होट करू शकतात तर (downvote) तर YouTube च्या कमेंट्स सेक्शनमध्ये डिसलाइक (dislike) बटण असतं. असं काही ट्विटर करणार आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

(वाचा - Paytm अलर्ट! तुम्हालाही कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय का? सावध राहा, होऊ शकते फसवणूक)

दरम्यान अ‍ॅपल स्टोअरमधील लिस्टिंगवरून ट्विटरची पेड सेवा (Twitter Paid Service) ट्विटर ब्लूच्या किमतीबद्दल अंदाज बांधता येऊ शकतो. वाँगने ही सेवा वापरली आणि सांगितलं की या सेवेमध्ये युजरला कलर थिम्स आणि कस्टम अ‍ॅप आयकॉन्ससारखी प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत. कंपनी लवकरच रीडर मोड (Reader Mode) सेवाही उपलब्ध करून देण्याच्या तयारीत असल्याचं वाँगने सांगितलं.

ट्विटर या पेड सेवेमध्ये आवडती ट्विट्स एकत्र करून एका जागी सेव्ह करण्याचं फीचरही उपलब्ध करून देऊ शकतं. कंपनीने याच महिन्यात स्क्रोल पद्धत अवलंबली असून त्यातच मोकळेपणाने युजरला बातम्या वाचता याव्यात अशी सुविधा देण्याचा कंपनीचा विचार आहे. महत्त्वाचं म्हणजे ट्विटरने निवडक युजर्सनाच पेड सेवेबद्दलच्या सर्व्हेमध्ये सहभागी करून घेतलं होतं. त्यात undo send, custom colour options, profile badges, auto-replies, अशी फीचर्स पेड सेवेत उपलब्ध करून देण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.

First published:
top videos

    Tags: Tech news, Twitter