RBI चा इशारा! कोणी पर्सनल माहिती मागितल्यास फोन लगेच डिस्कनेक्ट करा, जाणून घ्या या सूचना

RBI चा इशारा! कोणी पर्सनल माहिती मागितल्यास फोन लगेच डिस्कनेक्ट करा, जाणून घ्या या सूचना

आरबीआयने याबाबत ग्राहकांना काही सावधगिरी बाळगून स्वत:ला कसं सुरक्षित ठेवता येईल याबाबत सूचना दिल्या आहेत. RBI ने आपल्या या जागरुकता अभियानाला 'RBI सांगतंय... जागरुक राहा, सावध राहा' अशी टॅगलाईन दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मार्च : देशात कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. ऑनलाईन व्यवहारात वाढ होत असताना, दुसरीकडे ऑनलाईन बँकिंग फ्रॉडमध्येही मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बँकिंग फ्रॉडच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. अनेक लोक कमी माहिती किंवा बेजबाबदारपणामुळे स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अनेकदा फेक माहितीमुळेही युजर्सचं बँक अकाउंट खाली होतं.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना अशाप्रकारच्या फ्रॉडबाबत इशारा दिला आहे. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी थोडी सतर्कता दाखवल्यास, बँक फ्रॉडपासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. आरबीआयने याबाबत ग्राहकांना काही सावधगिरी बाळगून स्वत:ला कसं सुरक्षित ठेवता येईल याबाबत सूचना दिल्या आहेत. RBI ने आपल्या या जागरुकता अभियानाला 'RBI सांगतंय... जागरुक राहा, सावध राहा' अशी टॅगलाईन दिली आहे.

(वाचा - Alert! WhatsApp वर असा मेसेज आल्यास सावधान; एका क्लिकने होऊ शकतं मोठं नुकसान)

RBI ने फ्रॉडपासून वाचण्यासाठी दिल्या सूचना -

- RBI ने सांगितलं की, काही सेकंदात सायबर फ्रॉड केले जातात. त्यामुळे ग्राहकांनी आपली पर्सनल माहिती कार्ड डिटेल्स, बँक अकाउंट, पॅन आधार नंबर असा कोणताच डेटा कोणाशीही शेअर करू नका. अनेक फ्रॉड करणारे स्कॅमर्स, बँकेचे कर्मचारी असल्याचं सांगत बोलण्यात गुंतवून तुमच्या अकाउंटशी संबंधित सर्व माहिती काढून घेतात. त्यानंतर अकाउंट खाली झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बँकेची कोणतीही माहिती कोणलाही देऊ नका.

(वाचा - घरबसल्या ऑर्डर करा पेट्रोल-डिझेल; ही कंपनी करणार डोर-टू-डोर फ्यूल डिलिव्हरी)

- त्याशिवाय, रिझर्व्ह बँकेने KYC डिटेल्सही कोणाशी शेअर न करण्याचं सांगितलं आहे. KYC च्या नावानेही अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. या कारणानेही ग्राहकांकडून बँक डिटेल्स मागितले जातात. चुकूनही असं कोणाच्याही बोलण्यता येऊन त्याला सर्व डिटेल्स देऊ नका, अन्यथा मोठा फटका बसू शकतो.

(वाचा - पुढील वर्षापासून बदलणार टोल कलेक्शनची प्रक्रिया, तुमच्यावर काय परिणाम होणार)

- फोन कॉल करुन एखाद्याकडून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक अकाउंट नंबर, CVV किंवा OTP संबंधी कोणतेही प्रश्न विचारले जात असल्यास, असा कॉल त्वरित डिस्कनेक्ट करा.

Published by: Karishma Bhurke
First published: March 25, 2021, 6:16 PM IST

ताज्या बातम्या