मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

RBI चा मोठा निर्णय, कार्ड टोकेनायजेशनची तारीख पुढील सहा महिन्यांनी वाढवली; वाचा काय आहे Card Tokenisation

RBI चा मोठा निर्णय, कार्ड टोकेनायजेशनची तारीख पुढील सहा महिन्यांनी वाढवली; वाचा काय आहे Card Tokenisation

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने कार्ड टोकेनायजेशन (Card Tokenization) सिस्टम लागू करण्याची तारीख वाढवली आहे. 30 जून 2022 पर्यंत ही तारीख वाढवण्यात आली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने कार्ड टोकेनायजेशन (Card Tokenization) सिस्टम लागू करण्याची तारीख वाढवली आहे. 30 जून 2022 पर्यंत ही तारीख वाढवण्यात आली आहे. याआधी कार्ड टोकेनायजेशन सिस्टम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होती. परंतु आरबीआयने आपल्या निवेदनात सर्व पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सना COF कार्ड ऑन फाइल (Card-on-File) डेटाच्या स्टोरेजची टाइमलाइन 6 महिन्यांनी अर्थात 30 जून 2022 पर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे कार्ड टोकेनायजेशन सिस्टम?

कार्ड टोकेनायजेशन सिस्टम अंतर्गत क्रेडिट आणि डेबिट कार्डवरुन ऑनलाइन पेमेंट करताना थर्ड पार्ट App ला संपूर्ण डिटेल्स शेअर करावे लागणार नाहीत. टोकन नंबरच्या मदतीने डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स शेअर केल्याशिवाय युजर्स ऑनलाइन पेमेंट करू शकतील.

ऑनलाइन मर्चेंट आपल्या प्लॅटफॉर्मवर स्टोर करू शकणार नाही कार्ड डिटेल्स -

ऑनलाइन पेमेंट दरम्यान ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती स्टोर केली जात होती. परंतु नव्या निर्देशांनुसार, 1 जुलै 2022 पासून ऑनलाइन पेमेंट मर्चेंट, कार्ड युजर्सच्या कार्डची माहिती आपल्या प्लॅटफॉर्मवर स्टोर करू शकणार नाही. त्याऐवजी प्रत्येक कार्डसाठी एक टोकन नंबर जारी करावा लागेल.

तुम्हीही Olaने प्रवास करता का?कंपनीने घेतला नवा निर्णय;तुम्हाला होणार मोठा फायदा

देशात जवळपास 98.5 कोटी कार्ड असल्याचा अंदाज -

भारतात जवळपास 98.5 कोटी कार्ड असण्याचा अंदाज आहे, ज्याद्वारे दररोज 4000 कोटी रुपयांचा व्यवहार होत असल्याची माहिती आहे.

सावधान! पुढे धोका आहे! Driving करताना हे Mobile app तुम्हाला करेल Alert

इंडस्ट्री बॉडी CII ने व्यक्त केली चिंता -

इंडस्ट्री बॉडी कंफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री सीआयआय CII ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांच्या डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती सबमिट करण्याऐवजी टोकन क्रमांक जारी करण्याची नवी सिस्टम लागू केल्यामुळे ऑनलाइन व्यापाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या 20-40 टक्के नुकसान होऊ शकतं, अशी शंका CII ने उपस्थित केली आहे.

First published:

Tags: Credit card, Tech news