नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : भारतात सध्या 5G नेटवर्क आलं नसलं, तरी 5G सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनचे (5G Smartphone) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या कमी बजेटमध्ये अनेक चांगल्या 5G स्मार्टफोनचे ऑप्शन आहेत. रक्षाबंधनाचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. तुमच्या बहिणीला किंवा भावाला मोबाईल फोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल, तर 5G फोनचे अनेक चांगले पर्याय आहेत. कमी किमतीत चांगले फीचर्स असलेला फोन खरेदी करू शकता.
रेडमी नोट 10 T (Redmi Note 10T) -
- 6.5 इंची फुल HD+ डिस्प्ले
- ऑक्टाकोर मीडियाटेक 700 SoC
- 6GB पर्यंत रॅम
- 5000 mAh बॅटरी
- 48MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा
- कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.1, GPS/ A-GPS, इन्फ्रारेड (IR) ब्लास्टर, NFC, USB टाइप-C, आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहेत.
भारतात Redmi Note 10T 5G फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी आहे.
पोको एम 3 प्रो (POCO M3 Pro 5G) -
- 6.5 इंची डिस्प्ले, FHD+ रेजोल्यूशन
- पंच-होल नॉच
- गोरिला ग्लास 3 लेयर
- 48MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा
- 5000 mAh बॅटरी
फोनची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये इतकी आहे.
OPPO A53S 5G -
- 6.52 इंची HD+ डिस्प्ले
- मीडियाटेक Dimensity 700 प्रोसेसर
- 5000 mAh बॅटरी
- 13MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा
हा फोन 14,990 रुपयांच्या सुरुवाती किमतीत लाँच करण्यात आला आहे.
Redmi Note 10 5G -
- 6.5 इंची डिस्प्ले
- 48MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा
- 5000 mAh बॅटरी
- Octa-core प्रोसेसर
- MediaTek MT6833 Dimensity 700 5G
या फोनची सुरुवातीची किंमत 14,499 रुपये इतकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.