मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /लोकप्रिय Quran App वर चीनची बंदी, Apple Store मधून हटवलं

लोकप्रिय Quran App वर चीनची बंदी, Apple Store मधून हटवलं

चिनी सरकारच्या आदेशानंतर ॲपल कंपनीने चीनमधील ॲप स्टोअरमधून Quran Majeed हे ॲप काढून टाकलं आहे.

चिनी सरकारच्या आदेशानंतर ॲपल कंपनीने चीनमधील ॲप स्टोअरमधून Quran Majeed हे ॲप काढून टाकलं आहे.

चिनी सरकारच्या आदेशानंतर ॲपल कंपनीने चीनमधील ॲप स्टोअरमधून Quran Majeed हे ॲप काढून टाकलं आहे.

    नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : जगभरातील मुस्लिमांसाठी कुराण हा ग्रंथ पवित्र आणि पूज्य आहे. सध्या ऑनलाईनच्या विश्वात कुराणशी संबंधित अनेक ॲप उपलब्ध आहेत. मोबाईलमध्ये कुराण वाचणं त्यामुळे सोपं होतं. ॲपल कंपनीच्या ॲप स्टोअरमध्येही Quran Majeed हे ॲप उपलब्ध आहे. पण चिनी सरकारच्या आदेशानंतर ॲपल कंपनीने चीनमधील ॲप स्टोअरमधून Quran Majeed हे ॲप काढून टाकलं आहे. यासंबंधीचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे. या ॲपमध्ये बेकायदेशीर धार्मिक मजकूर (Religious Content) असल्याचं सांगत चीन सरकारने ॲपल कंपनीला ते हटवण्यास सांगितल्याची माहिती आहे.

    ॲपल स्टोअरमध्ये कुराण माजीद या ॲपबद्दल 1 लाख 50 हजार रिव्ह्यू आले आहेत. जगभरातील ॲप स्टोअरवर नजर ठेवणाऱ्या ॲपल सेन्सॉरशिप (Apple Censorship) विभागाला चीनच्या ॲप स्टोअरमधून कुराणचं ॲप काढून टाकल्याचं लक्षात आलं.

    Quran Majeed हे ॲप तयार करणाऱ्या पीडीएमएस कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, आमच्या कुराण माजीद या ॲपसाठी अधिक डॉक्युमेंटेशनची (Documentation) गरज असल्याचं चिनी अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. त्यामुळे चिनी ॲप स्टोअरमधून आम्ही तुमचं ॲप हटवत आहोत, असं ॲपलने आम्हाला कळवलं आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चीनच्या सायबर स्पेसॲडमिनिस्ट्रेशन (Chinese Cyber Space Administration) आणि या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. चीनमध्ये आमच्या कंपनीची ॲप वापरणाऱ्यांची संख्या एक मिलियनच्या जवळ पोहोचली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    चीनमधील द चायनीज कम्युनिस्ट पार्टीने अधिकृतपणे चीनमध्ये इस्लामला धर्म म्हणून मान्यता दिली आहे. पण चीनने झिजियांग प्रांतातील उईघर मुस्लिमांचा छळ केल्याचं सगळ्या जगाला माहीत आहे.

    स्मार्टफोन वापरकर्त्यांची प्रायव्हसी धोक्यात, हे App करतायत मोबाइलमध्ये घुसखोरी

    ॲपल कंपनी (Apple Company) स्थानिक नियमांचं पालन करायला बांधिल असून कधीकधी तिथल्या सरकारची धोरणं कंपनीला मान्य नसतील तरीही आम्हाला ती पाळावे लागतात हा त्यांच्या कंपनीचा नियम त्यांनी बीबीसीला सांगितला आहे.

    या ॲपने चीनमधील कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ॲप तयार करणाऱ्या कंपनीचा दावा आहे, की जगभरातील 35 मिलियन मुस्लीम या ॲपवर विश्वास ठेवतात.

    रशियाच्या तुरुंगात असलेले तिथले विरोधी पक्षनेते अलेक्सी नावल्नी (Alexei Navalny) यांचं टॅक्टिकल व्होटिंगशी संबंधित ॲप गेल्या महिन्यात ॲपल आणि गुगल यांनी काढून टाकलं होतं. रशियातील सत्ताधारी पक्षाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी हे ॲप काढून टाकलं नाही, तर दोन्ही कंपन्यांना मोठा दंड भरावा लागेल अशी धमकी दिल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली होती. चीन हे ॲपलचं मोठं मार्केट आहे. तसंच चीनमध्ये तयार होणाऱ्या मोबाईलवरही कंपनी मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

    ॲपलचे चीफ एक्झिक्युटिव्ह टीम कूक यांनी अमेरिकी राजकारण्यांवर टीका करून चीनबद्दल ते बोलत नसल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. 2017 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 7 मुस्लिमबहुल देशांवर बंदी घातली होती त्याच्यावर कूक यांनी टीका केली होती. चीन सरकारने अल्पसंख्य मुस्लिमांना दिलेल्या वागणुकीबाबतही कूक यांनी वक्तव्य केलेलं नाही. द न्यूयॉर्क टाइम्सने या वर्षाच्या सुरुवातीला ॲपल चीनमध्ये काही ॲप बंद करण्यासंबंधीचं वृत्त दिलं होतं.

    Google Doodle on COVID-19: कोरोनावरील उपाययोजनांबाबत जनजागृतीसाठी खास डुडल

    ॲपल सेन्सॉरशीपचे प्रोजक्ट डायरेक्टर बेंजामिन इस्माईल म्हणाले,‘सध्याॲपलचा सेन्सॉरशीप ब्युरो ऑफ बीजिंग झाला आहे. ते त्यांना हवं ते करतात आणि नंतर चिनी सरकारच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागतं.’

    ऑलिव्ह ट्रीज बायबल ॲप (Olive Tree's Bible app) हे ॲप देखील गेल्या आठवड्यात ॲप स्टोअरने चीनमध्ये हटवलं आहे. कंपनीने स्वत: हे ॲप हटवल्याचं स्पष्ट केलं आहे.‘मेनलँड चायनामध्ये पुस्तक किंवा नियतकालिकासंबंधी ॲप वितरित करताना स्थानिक अधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे असं ॲपलने आपल्या रिव्ह्यू प्रोसेसदरम्यान ऑलिव्ह ट्री बायबल सॉफ्टवेअर कंपनीला सांगितलं होतं. आमच्याकडे ती परवानगी नाही आणि ते वितरणाची परवागीही आम्हाला घ्यायची आहे म्हणून आम्ही ऑलिव्ह बायबल ॲप चीनमधील ॲप स्टोरमधून हटवत आहोत,’असं ॲपलच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं.

    चीनमधील सरकारच्या व्यवसायासंबंधी परवानग्या मिळवणं कठीण झाल्यामुळे अमेझॉनने ऑडिबलचं ॲप गेल्या महिन्यात ॲप स्टोअरमधून काढून टाकलं होतं. तसंच काही पत्रकारांची लिंक्डइन अकाउंट ब्लॉग केल्यानंतर तिथल्या सरकारने लिंक्डइन अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर लिंक्डइननेही चीनमधील व्यवहार बंद करण्याची घोषणा केली होती.

    First published:

    Tags: Apple, Apps