• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • नव्या रुपात iPhone 12 आणि iPhone 12 Mini लाँच; काय आहे किंमत

नव्या रुपात iPhone 12 आणि iPhone 12 Mini लाँच; काय आहे किंमत

भारतातील युजर्स आता नव्या रुपातील आयफोन 12 (iPhone12) आणि आयफोन 12 मिनी (iPhone12 Mini) खरेदी करू शकणार आहेत. या दोन्ही फोन्सचे व्हेरिएंट पर्पल रंगात (Purple Colour) लाँच करण्यात आले असून, हे देखील विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 3 मे: अ‍ॅपलने (Apple) नुकतंच Spring Loaded इव्हेंटमध्ये नवी डिव्हाईस लाँच केली आहेत. या डिव्हाईसची विक्री भारतात सुरू झाली आहे. यामुळे भारतातील युजर्स आता नव्या रुपातील आयफोन 12 (iPhone12) आणि आयफोन 12 मिनी (iPhone12 Mini) खरेदी करू शकणार आहेत. या दोन्ही फोन्सचे व्हेरिएंट पर्पल रंगात (Purple Colour) लाँच करण्यात आले असून, हे देखील विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसंच कंपनीने आपलं सर्वात स्वस्त उत्पादन एअरटॅग (AirTag) हे प्रोडक्ट देखील उपलब्ध केलं आहे. या सोबतच कंपनीने आयपॅड प्रो (2021), आयमॅक (2021) आणि अ‍ॅपल टिव्ही 4kच्या प्री-ऑर्डर घेणं देखील सुरू केलं आहे. नव्या रुपातील आयफोन्सची किंमत - पर्पल आयफोन 12 (Purple iPhone12) ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. या फोनच्या 128 जीबी मॉडेलची किंमत 84,900 रुपये आणि 256 जीबी मॉडेलची किंमत 94,900 रुपये अआहे. तसंच पर्पल iPhone 12 Mini च्या 64 जीबी मॉडेलची किंमत 69,900 रुपये,128 जीबी मॉडेलची किंमत 74,900 तर 256 जीबी मॉडेलची किंमत 84,900 रुपये आहे.

(वाचा - आता तुमच्या जवळचं वॅक्सिनेशन सेंटर शोधण्यासाठी WhatsAppकरणार मदत;अशी आहे प्रोसेस)

स्वस्तात AirTag खरेदीची संधी - भारतात अ‍ॅपल एअरटॅगची (Apple AirTag) किंमत 3190 रुपये आहे. परंतु, जर युजर्सने एकावेळी 4 युनिट्स खरेदी केले, तर त्यांना यासाठी केवळ 10,900 रुपये मोजावे लागतील. अ‍ॅपल एअरटॅग हा एक ब्लुटूथ ट्रॅकर आहे. या माध्यमातून युजर्स किमती सामान ट्रॅक करु शकतात. युजर्स हा AirTag आपल्या फोनवर किंवा बॅगेवर लावू शकतात. नव्या आयफोन प्रमाणे हे डिव्हाईस (Device) अ‍ॅपलच्या ऑनलाइन स्टोअर्स किंवा अ‍ॅपलच्या रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे.

(वाचा - Coronavirus: पल्स Oximeter खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

आयफोन 12 चे फीचर्स - अ‍ॅपल आयफोन 12 हा 5G स्मार्टफोन असून, यात 6.10 इंची डिस्प्ले (Display) देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये A14 Bionic प्रोसेसर आणि iOS 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे. आयफोन 12 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप (Camera Setup) देण्यात आला आहे. आयफोन 12 मिनी फीचर्स - या फोनला 5.4 इंची सुपर रेटीना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन 12 मिनीला ड्युअल सिम सपोर्ट (Dual Sim Support) आहे. या फोनमध्ये युजर्स मिनी आणि नॅनो सिम कार्ड वापरु शकतात.
First published: