Home /News /technology /

Electric Scooter मध्ये आग लागल्याने वृद्धाचा मृत्यू, या कंपनीने ग्राहकांकडून परत मागवल्या आपल्या टू-व्हीलर

Electric Scooter मध्ये आग लागल्याने वृद्धाचा मृत्यू, या कंपनीने ग्राहकांकडून परत मागवल्या आपल्या टू-व्हीलर

इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये आग लागण्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांत समोर आल्या. आता याच दरम्यान इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी Pure EV ने ग्राहकांकडून आपल्या स्कूटर परत मागवण्यासाठी रिकॉल केलं आहे.

  नवी दिल्ली, 22 एप्रिल : इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये आग लागण्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांत समोर आल्या. आता याच दरम्यान इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी Pure EV ने ग्राहकांकडून आपल्या स्कूटर परत मागवण्यासाठी रिकॉल केलं आहे. Pure EV India ETrance, EPluto आणि ETryst सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर बनवते. कंपनीने तेलंगाना आणि तमिळनाडूमध्ये आगीच्या घटनांदरम्यान आपल्या जवळपास 2000 इलेक्ट्रिक टू-व्हीलर रिकॉल केल्या आहेत. मागील आठवड्यात भारतातील टॉप इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी Okinawa Autotech नेही आगीच्या घटनांदरम्यान आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे 3000 हून अधिक यूनिट्स परत मागितले होते. Pure EV अशाप्रकारे रिकॉल करणारी दुसरी इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी आहे.

  हे वाचा - VIDEO: Electric Scooter मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी आग, 20 गाड्या जळून खाक

  स्कूटरमध्ये आग लागल्याने वृद्धाचा मृत्यू - हैदराबादजवळ निजामाबादमध्ये गुरुवारी Pure EV स्कूटरच्या बॅटरीमध्ये आग लागली. या घटनेत 80 वर्षीय वृद्धाचा जळल्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बॅटरी घरात चार्जिंगला असताना आग लागल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेत कुटुंबातील इतर तीन जणही जखमी झाले आहेत. त्यानंतर Pure EV ने या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून अॅक्शन घेत टू-व्हीलर रिकॉल केल्या आहेत. रिकॉल केलेल्या स्कूटर्समध्ये ETrance+ आणि EPluto 7G इलेक्ट्रिक स्कूटर सामिल आहेत. Pure EV ने दिलेल्या माहितीनुसार, रिकॉल केलेल्या गाड्यांचा आणि बॅटरीचा सखोल तपास केला जाईल. कंपनी डिलरशिप नेटवर्कच्या माध्यमातून सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचेल. मागील आठवड्यात ओकिनावा ऑटोटेकनेही आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स ओकिनावा प्रेज प्रोचे 3215 यूनिट्स रिकॉल केले होते. ओकिनावाने या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये मागील आठवड्यात आगीच्या घटनांनंतर बॅटरीशी संबंधित कोणतीही समस्या तपासण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी गाड्या रिकॉल केल्या होत्या.

  हे वाचा - नवी कार घेताय? या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित Cars, क्रॅश टेस्टमध्ये मिळालं 5 स्टार रेटिंग

  दरम्यान मागील आठवड्यात पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्यानंतर सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या आगीच्या प्रकरणांनंतर या विरोधात कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Electric vehicles

  पुढील बातम्या