टेलिस्कोप पडल्याने जगातला सगळ्यात मोठा ऍन्टिना उद्ध्वस्त, आता ही माहिती मिळणार नाही

टेलिस्कोप पडल्याने जगातला सगळ्यात मोठा ऍन्टिना उद्ध्वस्त, आता ही माहिती मिळणार नाही

प्यूर्टो रिकोमध्ये असलेला जगातील सगळ्यात मोठा ऍन्टिना मंगळवारी झालेल्या एका अपघातात उद्धवस्त झाला आहे. हा ऍन्टिना तब्बल 450 फूट खाली कोसळून जमीनदोस्त झाला.

  • Share this:

प्यूर्टो रिको : प्यूर्टो रिकोमध्ये असलेला जगातील सगळ्यात मोठा ऍन्टिना मंगळवारी झालेल्या एका अपघातात उद्धवस्त झाला आहे. हा ऍन्टिना तब्बल 450 फूट खाली कोसळून जमीनदोस्त झाला. यानंतर एलियन (परग्रहवासी) ग्रह आणि ॲस्ट्रॉइड्स यांची जगाला माहिती देणारी ही संपूर्ण वेधशाळाच ठप्प झाली.

मंगळवारी या ऍन्टिनावर एक टॉवर आणि काही केबल्स पडल्या. त्यामुळे डिश ऍन्टिनाही कोसळला. गेल्या महिन्यातच याची एक केबल तुटल्यानं हा ऍन्टिना बिघडला होता. जेम्स बाँडच्या गोल्डन आय या चित्रपटाचे शूटिंगही यावर झाले होते.

रॉयटर्स संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, प्यूर्टो रिकोमधील आर्सीबो वेधशाळेत (Arecibo Observatory) हा ऍन्टिना लावलेला होता. अंतराळातून येणारे धोके जसे की ॲस्ट्रॉइड्स, मीटियर्स तसेच एलियन्स यांची माहिती जगभरातील वैज्ञानिकांना याच ऍन्टिनामुळे मिळत होती. या वेधशाळेचे संचालन एन. जी. मेंडेज युनिव्हर्सिटी, नॅशनल सायन्स फाउंडेशन (US National Science Foundation-NSF) आणि फ्लोरिडा युनिव्हर्सिटी मिळून करतात. ही वेधशाळा निर्माण करण्यासाठी तीन वर्षे लागली होती. 1960 मध्ये तिच्या उभारणीचं काम सुरू झालं होतं ते 1963 मध्ये पूर्ण झाले. या वेधशाळेच्या तुटलेल्या केबलचं वजन ५.४ लाख किलोग्रॅम आहे.

काय काम होतं या ऍन्टिनाचे?

1007 फूट तीन इंच व्यासाचा हा गोलाकार ऍन्टिना होता. दूर अंतराळात होणाऱ्या अनेक घडामोडी हा ऍन्टिना टिपत असे. पृथ्वीकडे येणाऱ्या खगोलीय वस्तूंबाबत माहिती देणे हे याचे मुख्य काम होते. या ऍन्टिनामध्ये 40 हजार अॅल्युमिनियम पॅनल्स लावण्यात आले होते. ज्याच्या आधारे अंतराळातून येणारे सिग्नल्स टिपणे शक्य होत होते. या ऍन्टिनाला आर्सीबो रडार म्हणतात. ही आर्सीबो वेधशाळा उभारण्याची कल्पना प्रथम कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर विलियम ई गोर्डन यांनी मांडली होती.

या ऍन्टिनाच्या बरोबर मध्ये एक रिफ्लेक्टर आहे. जो ब्रिजच्या आधारे अधांतरी लटकला आहे. इथे असे दोन रिफ्लेक्टर्स लावण्यात आहेत. एक 365 फूट अंतरावर तर दुसरा 265 फूट अंतरावर. सर्व रिफ्लेक्टर्स उंच टॉवर्सवर मजबूत अशा स्टीलच्या तारांनी बांधले आहेत. हा ऍन्टिनाना एकूण 20 एकर परिसरात पसरलेला होता. याची खोली 167 फूट आहे. यातल्या काही केबल्स तुटल्या, ज्यांचं वजन 2.83 लाख किलो होतं. या ऍन्टिनाला 100 फुटावर एक छेद गेला होता, त्यामुळे याचा एक मोठा भाग तुटून जमिनीवर कोसळला. या ऍन्टिनाच्या मदतीने जगभरातील सुमारे 250 शास्त्रज्ञ अंतराळातील घडामोडींवर नजर ठेवत होते.

बाँडपटासह अनेक चित्रपटांचे शूटिंग

या आर्सीबो वेधशाळेमध्ये पीयर्स ब्रॉस्नन जेम्स बाँड असलेल्या गोल्डन आय चित्रपटाचा क्लायमॅक्सचा सीन शूट करण्यात आला होता. याशिवाय इथं अनेक चित्रपट, वेबसिरीज आणि माहितीपट यांचे शूटिंग करण्यात आलं आहे. ज्युडी फॉस्टरचा चित्रपट कॉन्टॅक्टचे शूटिंगही इथं झालं होतं.

मंगळवारी सगळ्या केबल्स तुटल्या आणि डिश अँटेनावर पडल्या, त्यामुळे हा अँटेना उद्ध्वस्त झाला. अँटेनाच्या वर लटकत असलेला भागही कोसळला. त्यामुळे या वेधशाळेचं मोठं नुकसान झालं आहे. आर्सीबो वेधशाळेने ‘विज्ञान जगतातील एका दुनियेचा अंत झाला, असं ट्विट केलं आहे. हा ऍन्टिना कोसळला असला तरी याच्यामुळे कोणालाही धोका पोहोचलेला नाही किंवा कोणाचेही नुकसान झालेलं नाही.

सुरक्षा प्रणाली मजबूत करण्याचा उद्देश

हा ऍन्टिना उभारण्यात आला तेव्हा याचा एक उद्देश हा सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे हा होता. याच्या आधारे प्यूर्टो रिको बॅलेस्टीक मिसाईल प्रतिबंधक यंत्रणा मजबूत करू इच्छित होता. नंतर याचा उपयोग वैज्ञानिक कामांसाठी होऊ लागला. या ऍन्टिनाने केवळ अंतराळातील धोक्यांची माहिती दिली नाही, तर आसपासच्या देशांना नैसर्गिक आपत्तींचीही सूचना दिली. गेल्या 50 वर्षांत या ऍन्टिनाने चक्रीवादळे, भूकंप, वादळे यांचीही माहिती दिली.

आता हा 900 टनांचा सांगाडा काही केबल्सच्या आधारे लटकत आहे. त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे, अन्यथा तो कोसळू शकतो. हा ऍन्टिना पुन्हा उभारण्यासाठी मोठा कालावधी लागेल. या अपघातामध्ये तब्बल 89.46 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढच्या महिन्यापर्यंत नवीन केबल्स येण्याची शक्यता आहे. नॅशनल सायन्स फाउंडेशनने (US National Science Foundation-NSF) दुरुस्तीसाठी नुकसान झालेल्या सर्व रकमेची मागणी केली आहे.

Published by: Shreyas
First published: December 3, 2020, 9:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या