आता पुन्हा ऐकू येणार Enemies Ahead! 'या' तारखेला PUBG Mobile भारतात करणार वापसी

आता पुन्हा ऐकू येणार Enemies Ahead! 'या' तारखेला PUBG Mobile भारतात करणार वापसी

पब्जी प्रेमींसाठी मोठं दिवाळी गिफ्ट! लवकरच PUBG Mobile भारतात वापसी करण्याची शक्यता.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : अलीकडेच चिनी कंपनी Tencent ने भारतातले सर्व PUBG Mobile सर्व्हर बंद केले आहेत. PUBG Mobile वर याआधी भारतात बंदी घालण्यात आली होती, मात्र सर्व्हर गेल्यामुळे हा गेम युजर खेळू शकत नव्हते. रिपोर्टनुसार, PUBG Mobile पुन्हा भारतात परत येऊ शकतो. टेक क्रंचच्या मते, दोन सुत्रांनी याची पुष्टी केली की PUBG Mobile पुन्हा एकदा भारतात परतण्यास तयार आहे.

या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की PUBG Mobile ची मूळ कोरियन कंपनी गेल्या काही आठवड्यांपासून जागतिक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्सची चर्चा करीत आहे. दक्षिण कोरियाची कंपनी क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी स्थानिक पातळीवर भारतात स्थानिक डेटा स्टोअर करण्याबाबत चर्चा करीत आहे. यासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आली आहे, याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही आहे.

दिवाळीत पुन्हा येणार PUBG Mobile

या रिपोर्टनुसार गेमिंग कंपनीने भारताच्या हाय प्रोफाइल स्ट्रीमर्सना तयारी करण्यास सांगितले आहे. त्यांना सांगितले गेले आहे की या वर्षाच्या अखेरीस ते PUBG Mobile परत येण्याची अपेक्षा करू शकतात. PUBG कॉर्पोरेशननं अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही. मात्र अशी अपेक्षा आहे की या महिन्याच्या शेवटी ते दिवाळीच्या दुसर्‍या आठवड्यात भारतात परत येऊ शकतात.

Tencent सोबत भागीदारी संपवली

PUBG Mobile मुळ कोरियन Bluehole आता Krafton म्हणून ओळखली जाते. या कंपनीने Tencent सोबत केलेला करार रद्द केला आहे. Tencentची भारतात भागीदारी संपवण्याचे कारण स्पष्ट आहे. भारत सरकारनं चिनी कंपनी Tencent भारतीयांचा डेटा चोरू शकते, अशी शक्यता वर्तवल्यामुळे PUBG Mobileवर बंदी घालण्यात आली होती. इतर देशांसाठी PUBG Mobile चे अधिकार अजूनही Tencent कडेच आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: November 7, 2020, 8:40 AM IST

ताज्या बातम्या