Home /News /technology /

PUBG, लूडोसह तब्बल 275 चिनी अ‍ॅप्स बॅन करण्याच्या तयारीत सरकार, वाचा संपूर्ण लिस्ट

PUBG, लूडोसह तब्बल 275 चिनी अ‍ॅप्स बॅन करण्याच्या तयारीत सरकार, वाचा संपूर्ण लिस्ट

आता बॅन करण्यात आलेले 47 अ‍ॅप्स हे गेल्या महिन्यात बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्सचे क्लोनिंग करत होते.

    नवी दिल्ली, 27 जुलै : केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनला जबरदस्त झटका देत टेक कंपन्यांवर कारवाई केली आहे. सरकारनं चीनचे तब्बल 47 आणखी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. अद्याप हे 47 अ‍ॅप्स कोणते आहेत, याबाबत माहिती मिळाली नसली तरी मोदी सरकारने चीनवर केलेले हे दुसरे डिजिटल स्ट्राइक आहे. आता बॅन करण्यात आलेले 47 अ‍ॅप्स हे गेल्या महिन्यात बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्सचे क्लोनिंग करत होते. उदा. टिकटॉक (Tiktok) बॅन झाल्यानंतर लोकं टिकटॉक लाइट मात्र प्ले स्टोअरवर होते. याआधी चीनने केलेल्या कुरघोडींना उत्तर म्हणून गेल्या महिन्यात केंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अ‍ॅप्स बॅन केले होते. यामध्ये Shareit, कॅमस्कॅनर (CAMscanner) यांसारखे प्रसिद्ध अ‍ॅप्स होते. एवढेच नाही तर सरकार आता आणखी 275 अ‍ॅप्स बॅन करण्याच्या वाटेवर आहेत. यामध्ये पब्जी, लूडो, अलिबाबा सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश आहे. वाचा-मोठी बातमी! चीनला जबरदस्त झटका, भारत सरकारने आणखी 47 चिनी अ‍ॅप्स केले बॅन सरकार सध्या या 275 अ‍ॅप्सवर नजर ठेवून आहे. हे अ‍ॅप्स नॅशनल सिक्यूरिटी किंवा युझरची माहिती तर लीक करत नाही आहे ना, याची तपासणी केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपन्याचे सर्व्हर चीनमध्ये आहे, अशा कंपन्यांचे अ‍ॅप्स बॅन केले जाणार आहे. वाचा-ड्रॅगन काही ऐकेना! अमेरिकेसोबत तणावादरम्यान दक्षिण चीन सागरात लाइव्ह फायर ड्रिल हे प्रसिद्ध अ‍ॅप्स होऊ शकतात बॅन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं तयार केलेल्या यादीमध्ये काही प्रमुख गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश आहे. यात PUBG Mobile, Ludo World यांचा समावेश आहे. तसेच, रिव्ह्यू केले जात असलेल्या लिस्टमध्ये Xiaomiने तयार केलेले Zili अ‍ॅप, इ-कॉमर्स Alibabaचे Aliexpress अ‍ॅप, Resso अ‍ॅप आणि Bytedance चे ULike अ‍ॅप यांचा समावेश आहे. वाचा-चिनी कंपनीतील भारतीय कर्मचाऱ्याचा खुलासा; 'अलिबाबा'चे जॅक माला कोर्टाचा समन्स चिनी अ‍ॅप करत होते गैरवापर चायना अ‍ॅप्सच्या माध्यमातून चीन Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर काही अ‍ॅप्सचा गैरवापर करत आहे. हे अ‍ॅप्स गुप्तपणे आणि बेकायदेशीरपणे वापरकर्त्याचा डेटा चोरून तो भारताबाहेरील सर्व्हरवरला पाठवत होते. या व्यतिरिक्त भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र, गृह मंत्रालय यांनाही अशा धोकादायक अ‍ॅप्सवर तातडीनं बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार 59 अ‍ॅप्स भारतात न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: PUBG, Pubg game, Tiktok

    पुढील बातम्या