PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

पबजी मोबाईल (PubG mobile game) गेमचे भारतात कोट्यवधी चाहते आहेत. चायनीज मोबाईल ॲपवर बंदी घातल्यानंतर भारत सरकारने या गेमवरदेखील बंदी घातली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : पबजी मोबाईल (PubG mobile game) गेमचे भारतात कोट्यवधी चाहते आहेत. चायनीज मोबाईल ॲपवर बंदी घातल्यानंतर भारत सरकारने या गेमवरदेखील बंदी घातली होती. त्यानंतर पबजी इंडिया नावाने (PUBG Mobile India) नवीन गेम भारतीय बाजारात येणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पबजीचे चाहते याची आतुरतेने वाट पाहत होते. लवकरच भारतात ही गेम लाँच होणार असल्याचं बोलल जात होतं. पण कंपनीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून भारतात ही गेम कधी लाँच होणार याविषयी देखील शक्यता वर्तवली आहे.

मागील आठवड्यात देखील कंपनीने यासंदर्भात अजूनही कोणतीही घोषणा झाली नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता भारताच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (Ministry of Electronics and Information Technology) यासंदर्भात मान्यता मिळाली नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. कंपनीने या गेमला मान्यता देण्यासाठी बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. पण मंत्रालयाकडून याबाबतीत काही उत्तर आले नसून याची वाट पाहत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

भारत सरकारने घातलेल्या सर्व अटींचं पालन करून कंपनीने हा गेम तयार केल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे परवानगी मिळण्याची आम्ही वाट पाहत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. भारत सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये पबजी गेम, पबाजी लाईट या गेमवरदेखील चायनीज ॲपबरोबर बंदी घातली होती. पबजी या गेममध्ये चीनमधील टेंन्संट गेमिंगची गुंतवणूक असल्यामुळे भारतात बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतर पबजी कॉर्पने भारतामधून त्याचा वितरण भागीदार म्हणून टेंन्सेंटला वेगळे केले. त्यानंतर हा गेम पुन्हा भारतात सुरु करण्यासाठी अधिकृत भारतीय सहाय्यक कंपनी पबजी इंडियादेखील स्थापन केली. सध्या कंपनीचे अधिकारी दीर्घ काळापासून मंत्रालयातील अधिकाऱ्यांना बैठकीसाठी विनंती करत आहेत.

दरम्यान, सरकारने अद्याप बंदी घातलेल्या 267 चिनी ॲप्सना पुन्हा भारतात वापरण्यास मंजुरी दिलेली नाही. भारतीय सायबर स्पेसमध्ये चीनच्या घुसखोरीची चिंता आणि भारतीय नागरिकांचा डेटा सुरक्षित नसल्याच्या संशयामुळे भारत सरकारने या ॲपवर बंदी घातली होती. या डेटा चोरीमुळे भारताच्या सार्वभौमत्वालाही धोका होता. सरकारच्या या निर्णयामुळे टिकटॉक, (tiktok)पबजी मोबाइल, अली एक्सप्रेस, कॅमस्केनर, शेअरिट आणि इतर अनेक लोकप्रिय ॲपला भारतात बंदी घालण्यात आली आहे.

Published by: Shreyas
First published: December 3, 2020, 8:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या