मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आनंदाची बातमी! PUBG Mobile India ला मिळाली सरकारची परवानगी, 'या' तारखेला होणार लॉंच

आनंदाची बातमी! PUBG Mobile India ला मिळाली सरकारची परवानगी, 'या' तारखेला होणार लॉंच

PUBG Mobile India Launch Latest Update: 20 नोव्हेंबर 2020 रोजी कर्नाटकमध्ये तयार झालेली  PUBG  India ही PUBG  कॉर्पोरेशनची एक भारतीय सहाय्यक कंपनी आहे.

PUBG Mobile India Launch Latest Update: 20 नोव्हेंबर 2020 रोजी कर्नाटकमध्ये तयार झालेली PUBG India ही PUBG कॉर्पोरेशनची एक भारतीय सहाय्यक कंपनी आहे.

PUBG Mobile India Launch Latest Update: 20 नोव्हेंबर 2020 रोजी कर्नाटकमध्ये तयार झालेली PUBG India ही PUBG कॉर्पोरेशनची एक भारतीय सहाय्यक कंपनी आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : PUBG Mobile गेमचा भारतात परतीचा मार्ग आता स्पष्ट झाला आहे. PUBG Mobile Indiaच्या लॉंचच्या घोषणेनंतर आता या गेमच्या नोंदणीला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. PUBG India प्रायव्हेट लिमिटेड आता भारतात नोंदणीकृत कंपनी बनली आहे. हे स्पष्ट आहे की लवकरच PUBG Mobile India लॉन्च केले जाऊ शकते. 20 नोव्हेंबर 2020 रोजी कर्नाटकमध्ये तयार झालेली PUBG India ही PUBG कॉर्पोरेशनची एक भारतीय सहाय्यक कंपनी आहे.

PUBG कॉर्पोरेशननं या कंपनीला PUBG India Private Limited नावाने नोंदणी केली आहे. त्याला कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या नोंदणीकृत कंपनीच्या रूपात PUBG India Private Limited दाखवण्यात आले आहे. यासह, एक वैध कॉर्पोरेट ओळख क्रमांक (CIN) देण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार 20 नोव्हेंबर 2020 रोजी PUBG India ची नोंद बेंगळुरुत झाली होती.

वाचा-भारतात पहिल्यांदाच ! रोबो देत आहे गाडीची डिलिव्हरी

भारत सरकारच्या नियमांनुसार सेटअप तयार

टेक वेबसाइट बिझनेस इनसाइडरच्या मते PUBG ने भारतीय युजरटा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मायक्रोसॉफ्टची क्लाऊड सर्व्हिस Azure ची निवड केली आहे. या नवीन प्रजोक्टसाठी PUBG ची मूळ कंपनी Krafton Inc मायक्रोसॉफ्टबरोबर हात मिळवला आहे. डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षिततेच्या भारत सरकारच्या नियमांनुसार हा सेटअप तयार केला जात आहे, जेणेकरून युजरचा डेटा सुरक्षित राहिल.

वाचा-Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर; महिन्याच्या बिलासाठी EMIचा पर्याय

इथं करा रजिस्ट्रेशन

PUBG Mobile India खेळण्यासाठी, भारतीय Android आणि iOS युजर TapTap गेम शेअर कम्युनिटीमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. ही सुविधा केवळ कम्युनिटी मेंबर्ससाठी आहे. आतापर्यंत सुमारे तीन लाख युजरने PUBG Mobile India खेळण्यासाठी नोंदणी केली आहे. TapTap स्टोअरचे रेटिंग 9.8 आहे. दरम्यान, याबाबत PUBG Corp. कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

वाचा-Disappearing Messages नंतर आता पुन्हा WhatsApp वर येणार नवे फीचर्स

नवीन आयडीची गरज नाही

मीडिया रिपोर्टनुसार PUBG Mobile India मध्ये वापरकर्त्यांना नवीन ID तयार करण्याची गरज भासणार नाही. यामध्ये केवळ युजरचा जुना आयडीच काम करेल. या व्यतिरिक्त, PUBG Mobile India ग्लोबल व्हर्जनपेक्षा थोडा वेगळा असेल. हा गेम अपडेटेड असल्याचे सांगितले जात आहे.

First published:

Tags: PUBG, Pubg game