PUBG चा भारतातला Digital Partner ठरला; सहज Download होणारं LITE व्हर्जन येणार

PUBG चा भारतातला Digital Partner ठरला; सहज Download होणारं LITE व्हर्जन येणार

कमी क्षमतेच्या काँप्युटरवर किंवा जुन्या व्हर्जनच्या सिस्टीमवर आणि इंटरनेटची कमी रेंज असेल तेव्हासुद्धा हा गेम खेळता यावा यासाठी कंपनीने PUBG LITE व्हर्जन आणायचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी JIO ला एक्सक्लुझिव्ह डिजिटल पार्टनर म्हणून मान्यता दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : PUBG या लोकप्रिय गेमचं नवं व्हर्जन लवकरच भारतात लाँच होणार आहे. PlayerUnknowns Battlegrounds अर्थात PUBG या कंपनीने यासाठी नव्या Beta service ची घोषणा केली आहे. ही बिटा सर्व्हिस PUBG च्या LITE व्हर्जनसाठी असेल. कमी क्षमतेच्या काँप्युटरवर किंवा जुन्या व्हर्जनच्या सिस्टीमवर आणि इंटरनेटची कमी रेंज असेल तेव्हासुद्धा हा गेम खेळता यावा यासाठी कंपनीने PUBG LITE व्हर्जन आणायचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी JIO ला एक्सक्लुझिव्ह डिजिटल पार्टनर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे भारतात हे दोन ब्रँड्स JIO आणि PUBG एकत्र आलेले दिसतील.

जिओ युजरना पब्जी लाईट व्हर्जनचा अॅक्सेस असणार आहे. हा गेम खेळण्यासाठी कुठलीही अतिरिक्त किंमत मोजावी लागणार नाही. फ्री टू प्ले PUBG LITE जिओ युजर्ससाठी उपलब्ध असेल. ज्या युजर्सनी या व्हर्जनसाठी रजिस्टर केलं आहे त्यांना इन गेम मर्चंडाइजसाठी कव्हर्स मोफत मिळणार आहेत.

JIO कडून गिफ्ट मिळवायची असेल तर अशी करा नोंदणी

1. PUBG LITE वापरू इच्छिणाऱ्या Jio users नी https://gamesarena.jio.com या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे. तिथे त्यांना एक छोटासा 2 स्टेप्सचा फॉर्म भरावा लागेल.

2. हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर युजरना एक व्हेरिफिकेशन लिंक मिळेल. त्यांच्या रजिस्टर्ड ई मेल आयडीवर ही लिंक येईल.

मोदींवर विश्वास ठेवून लोकांनी निवडून दिलं, शिवसेनेच्या खासदाराचा VIDEO व्हायरल

या लिंकच्या मदतीने व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर युजरला आणखी एक मेल येईल. या मेलमध्ये रिडिम्शन कोड unique redemption code असेल.

Redemption code कसा वापरायचा?

1. PUBG LITE डाउनलोड करून रजिस्टर केल्यानंतर मेन्यू स्टोअरमध्ये जा.

2. मेन्यू ऑप्शनमध्ये Add Bonus / Gift Code यावर क्लिक करा.

3. इथे दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा कोड टाका आणि redeem वर क्लिक करा.

‘बाहुबली’मधील 1 हजार फुटांच्या धबधब्याचा सीन पाण्याशिवायच झाला होता शूट

SPECIAL REPORT : भक्तांची अलोट गर्दी जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देते!

First published: July 10, 2019, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading