Home /News /technology /

तुमच्या Facebook प्रोफाईलवर फोटोऐवजी लावा Video; त्यासाठी अकाऊंटमध्ये अशी कराल सेटिंग

तुमच्या Facebook प्रोफाईलवर फोटोऐवजी लावा Video; त्यासाठी अकाऊंटमध्ये अशी कराल सेटिंग

Facebook Feature: फेसबुकने हे फीचर तसं बरंच अगोदर लाँच केलं होतं. मात्र, आपल्या प्रोफाईलवर हे कसं करायचं हेच बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. (How to add FB profile video) बाहेरुन पाहिल्यास आपला प्रोफाईल पिक हा इतर फोटोंप्रमाणेच दिसतो.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 26 जुलै:  फेसबुक (Facebook) असो वा इतर कोणताही सोशल मीडिया (Social Media), लोकं तुमचं प्रोफाईल पाहताना सर्वात आधी तुमचा प्रोफाईल पिक्चर पाहतात. तुम्हाला फ्रेंड किंवा फॉलो रिक्वेस्ट पाठवावी की नाही, किंवा तुमची रिक्वेस्ट स्वीकारावी की नाही हे बऱ्याच वेळा प्रोफाईल पिक पाहूनच ठरते. त्यामुळेच आपला प्रोफाईल पिक अधिकाधिक आकर्षक कसा ठेवता येईल याकडे सर्वांचं लक्ष असतं. कित्येक वेळा आपण पाहतो, की फेसबुकवर लोकांच्या प्रोफाईल पिकमध्ये फोटोऐवजी छोटा व्हिडिओ आहे. ही बाब नक्कीच युनिक आणि आकर्षक वाटते. (Facebook Profile video) फेसबुकने हे फीचर तसं बरंच अगोदर लाँच केलं होतं. मात्र, आपल्या प्रोफाईलवर हे कसं करायचं हेच बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. (How to add FB profile video) बाहेरुन पाहिल्यास आपला प्रोफाईल पिक हा इतर फोटोंप्रमाणेच दिसतो. पण, प्रोफाईल ओपन केल्यास याठिकाणी व्हिडिओ दिसू लागतो. काही सेकंदांचा व्हिडिओ आपल्याला याठिकाणी सेट करता येतो. (FB profile video settings) हे कसं करायचं याची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. प्रोफाईल पिकच्या जागी व्हिडिओ एक्स्प्रेशन (FB profile video expression) सेट करण्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोन, आणि त्यात फेसबुक अप असणं आवश्यक आहे. सर्वात आधी आम्ही तुम्हाला आयफोनवर ही सेटिंग कशी करता येईल हे सांगणार आहोत. पुढील टप्प्यांमध्ये दिलेली प्रोसेस फॉलो करुन तुम्ही आपल्या प्रोफाईल पिकच्या जागी व्हिडिओ सेट करू शकता. (FB profile video in iphone) Second Hand Phone घेताना फसू नका, या पद्धतीने ओळखा फोन चोरीचा तर नाही? सर्वात आधी आपल्या आयफोनमधील फेसबुक अॅपमध्ये लॉग इन करा. यानंतर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात क्लिक करा, यानंतर तुम्ही आपल्या प्रोफाईल पिकमध्ये (Profile pic) पोहोचाल. यानंतर आपल्या प्रोफाईल पिकवर टॅप करा, ज्यामुळे तुमच्यासमोर विविध पर्याय येतील. यात मग ‘टेक न्यू प्रोफाईल व्हिडिओ’ किंवा ‘सिलेक्ट प्रोफाईल पिक्चर ऑर व्हिडिओ’ यांपैकी एका पर्यायावर टॅप करा. पहिला पर्याय वापरून तुम्ही नवा व्हिडिओ थेट रेकॉर्ड करू शकाल. तर दुसरा पर्याय वापरून तुम्ही फोनच्या गॅलरीमधील व्हिडिओ निवडू शकाल. यानंतर एडिट हा पर्याय वापरुन तुमचा व्हिडिओ एडिट करुन घ्या. यानंतर ट्रिम (Trim) पर्याय वापरुन तुम्ही या व्हिडिओमधील काही भाग निवडू शकता. प्रोफाईल व्हिडिओला केवळ सात सेकंदांचा व्हिडिओच लावता येतो. त्यामुळे नेमके सात सेकंद कट करणं आवश्यक आहे. यानंतर साऊंड (Sound) हा पर्याय वापरुन तुम्ही याला हवा तो आवाज जोडू शकता. तसेच, व्हिडिओला थंबनेल (Thumbnail) लावण्यासाठी कव्हर वर टॅप करावे लागेल. यानंतर ‘डन’ (Done) पर्यायावर टॅप करा. पुढे जर तुम्हाला याला एखादी फ्रेम लावायची असेल, तर तोही पर्याय उपलब्ध आहे. तसेच, किती वेळासाठी हा प्रोफाईल व्हिडिओ ठेवायचा आहे याचाही पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. या ठराविक वेळानंतर हा व्हिडिओ आपोआप डिलिट होऊन त्याजागी तुमचा जुना प्रोफाईल पिक दिसू लागेल.

Android Smartphone वापरता का? Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका

अँड्रॉईड फोन्समध्येही (FB profile video in android) ही प्रक्रिया जवळपास सारखीच आहे. फेसबुक अपमधून आपल्या प्रोफाईलवर गेल्यानंतर, प्रोफाईल पिकवर टॅप करा. यानंतर आलेल्या पर्यायांमधून ‘टेक न्यू प्रोफाईल व्हिडिओ’ हा पर्याय निव़डा. यानंतरची प्रक्रिया वर सांगितल्याप्रमाणेच आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Facebook, Social media

पुढील बातम्या