• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • सरकारी टेंडर आणि नोकरी देण्याचं आमिष दाखवत अनेकांची फसवणूक, गँगचा पर्दाफाश

सरकारी टेंडर आणि नोकरी देण्याचं आमिष दाखवत अनेकांची फसवणूक, गँगचा पर्दाफाश

सरकारी टेंडर आणि नोकरी देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून: सरकारी टेंडर आणि नोकरी देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या फ्रॉडस्टर्सकडून 9 मोबाईल फोन आणि एक कार जप्त केली आहे. दिल्लीच्या दक्षिण पूर्व जिल्हा अतिरिक्त पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील गुन्हेगारी लक्षात घेता एसीपी उमेश बर्थवाल यांच्या देखरेखीखाली एक ऑपरेशन टीम तयार करण्यात आली. या पथकाने तपासादरम्यान एक गुप्त तंत्र विकसित केलं. या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मथुरा रोडवर एका कारला रोखण्यात आलं.

  (वाचा - फेसबुकवर मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक, प्रकार ऐकून व्हाल हैराण)

  कारमध्ये तीन जण मध्ये होते. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून नऊ मोबाईल फोन आणि एक कार जप्त केली गेली आहे. पोलिसांच्या चौकशीत या तिघांनी ते एकमेकांचे खास मित्र असल्याचंही सांगितलं.

  (वाचा - Smartphone मधून ही कामं करता? या गोष्टींपासून सतर्क राहा; अन्यथा फ्रॉडचा धोका)

  कमी वेळात अधिक पैसे कमावण्यासाठी त्यांनी अशी फसवणूक करण्यास सुरुवात केल्याचंही त्यांनी कबूल केलं. त्यासाठीच त्यांनी टेंडर आणि सरकारी नोकरी देण्याच्या नावाने लोकांची फसवणूक करण्याचं काम सुरू केलं.

  (वाचा - Google वर ही गोष्ट सर्च करत असाल तर वेळीच व्हा सावध; महिलेची अडीच लाखाची फसवणूक)

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपी यूपीतील वॉन्टेड गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर 50000 रुपयांचं बक्षिसही लावण्यात आलं आहे. या तिघांचीही यापूर्वीही अनेक प्रकरणात नावं सामिल आहेत.
  Published by:Karishma
  First published: