'प्रिपेड वॉलेट'ला केवायसी जोडलंय ?,नाहीतर सेवा उद्या होणार बंद

'प्रिपेड वॉलेट'ला केवायसी जोडलंय ?,नाहीतर सेवा उद्या होणार बंद

या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची विनंती प्रिपेड वॉलेट कंपन्यांनी केली होती. मात्र रिझर्व्ह बँकेनं ही विनंती धुडकावून लावली आहे.

  • Share this:

28 फेब्रुवारी : प्रिपेड वॉलेटच्या साह्यानं पेमेंट करण्यासाठी निवडलेल्या ''प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटची'' केवायसी प्रक्रिया ज्या ग्राहकांनी अध्याप पूर्ण केलेली नाही, त्या ग्राहकांना ही सुविधा 1 मार्चपासून वापरता येणार नाही.ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे.

या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची विनंती प्रिपेड वॉलेट कंपन्यांनी केली होती. मात्र रिझर्व्ह बँकेनं ही विनंती धुडकावून लावली आहे. देशात सध्या बिगरबँक पीपीआयची संख्या 55 तर बँकांनी प्रवर्तित केलेल्या प्रिपेड वॉलेटची संख्या 50 आहे.

पेटीएम, मोबिक्विक यांसारख्या प्रिपेड वॉलेट सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासीठी 31 डिसेंबर 2017 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

त्यानंतर ही मुदत वाढवून 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत करण्यात आली. मात्र अध्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्यांची प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटची सेवा उद्यापासून बंद होणार आहे.

First published: February 28, 2018, 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading