फेसबुकवर 'हे' शब्द लिहिलेत तर तुमच्यावर होईल कारवाई

फेसबुकवर 'हे' शब्द लिहिलेत तर तुमच्यावर होईल कारवाई

तुम्ही फेसबुकवर पोस्ट करताना काळजी घ्या. काय बेकायदेशीर आहे ते वाचा

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी : फेसबुकवर आता तुम्ही पोस्ट करताना नीट विचार करा. नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. पोस्टमध्ये आजाद काश्मीर असं असेल किंवा देवी-देवतांवर टीका केली किंवा तिरंग्याचं कापड कंबरेच्या खाली घातलंय असा फोटो हे सर्व बेकायदेशीर ठरेल. अशा 20 पोस्ट आहेत, ज्यांना भारतात फेसबुकनं बेकायदेशीर ठरवलंय. हा दावा इंडियन एक्सप्रेसनं फेसबुकचे आतले डाॅक्युमेंट्स तपासल्यावर केलाय.

जगभरातल्या फेसबुक कंटेटवर लक्ष ठेवणारी फेसबुक रिव्ह्युअरची टीम असते. लोक रिपोर्ट करतात किंवा फेसबुकच्या सिस्टिममध्ये काही शब्द चुकीचे ठरवलेले असतात. हे काम करण्यासाठी फेसबुककडे 15 हजार फुल टाइम काँट्रॅकवर काम करणारे कर्मचारी आहेत. ते ठरवतात, कुठली पोस्ट ठेवायची, कुठली काढून टाकायची. भारतात अशा पोस्ट युजरला न सांगता किंवा कायदेशीर सल्ला न घेता काढून टाकण्याचा प्रयोग केला जातोय.

मीडियासमोर मात्र फेसबुक वेगळंच म्हणतंय

फेसबुकनं असा दावा केलाय की कटेंट ब्लाॅक करण्याआधी फेसबुकचा वकिलांची टीम तपासून पाहते. फेसबुक म्हणतंय की कुठलाही कंटेंट त्या त्या देशात बेकायदेशीर असतो, त्याला फ्लॅग केलं जातं. याला IP-ब्लाॅकिंगही म्हटलं जातं. भारतात तयार झालेल्या अघोषित गाईडलाइन हेच दाखवते की कंपनी आपल्या माॅडरेटर्सकडे कंटेंट रिव्ह्यूसाठी पाठवतं.

फेसबुकनं अनेकदा असं सांगितलंय की आंतरराष्ट्रीय पाॅलिसी कुठल्याही श्रद्धेवर किंवा धर्मावर केलेल्या हल्ल्याला भारतात हेट स्पीच म्हणून बघत नाही. पण अनेक असं दिसतंय की अनेक कंपन्या भारतातला अनेक कंटेंट तपासून पहात असतात.

कंपनीच्या कागदपत्रात एक प्रश्न असतो, विभागाप्रमाणे बेकायदेशीर कंटेंट काय आहे? त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये ती शब्दांचं एक चित्र तयार झालंय.त्यावर फेसबुकसाठी सूचना लिहिल्यात.

असा कंटेंट ठेवा ज्यानं फेसबुकच्या नियमाचं उल्लंघन होणार नाही

जेव्हा सरकार त्या प्रांतात कडक कायदा लागू करतं, तेव्हा त्याचा सन्मान करा

ज्यामुळे फेसबुक ब्लाॅक होऊ शकतं किंवा त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा कंटेंट काढून टाकावा

फेसबुकनं इंडियन एक्सप्रेसच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत.  फेसबुकनं गाइडलाइन कुठल्या देशांमध्ये सुरू केलीय, हेही सांगितलं नाहीय.

देवी-देवता किंवा तिरंग्याला चुकीच्या पद्धतीनं दाखवणं

आॅपरेशन गाइडलाइन्स सेक्शनमध्ये पुढील कंटेंटला फ्लॅग करा असं म्हटलंय- आजाद काश्मीर किंवा अक्साई चीनचा नकाशा, देवता किंवा मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट, तिरंग्याच्या मधल्या चक्राच्या जागी महात्मा गांधींचा फोटो लावणं

राष्ट्रीय सीमारेषेच्या सेक्शनमध्ये वेगळ्या काश्मीरच्या मागणीचं समर्थन, काश्मीर किंवा सियाचीनवर पाकिस्तानच्या दाव्याची पोस्ट किंवा अक्साई चीन, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि त्रिपुरावर चीनचा दावा अशा पोस्ट फ्लॅग केल्या जातात.

या डाॅक्युमेंट्समध्ये कमीत कमी तीन स्लाइट्स धार्मिक कट्टरतेचेही सेक्शन आहेत. त्यावर थट्टा करायची परवानगी नाही.

ही गाइडलाइन सांगते की पैगंबर मोहम्मद यांचा फोटो IPCचं कलम 295चं उल्लंघन होऊ शकतं. हे कलम धार्मिक भावना भडकावणं, अपमान करणं यावर नियंत्रण ठेवू शकतं. एखाद्या फोटोखाली आक्षेपार्ह कॅप्शन असेल तर तो ब्लाॅग केला जाईल.

धार्मिक विभागात देवदेवतांचा अपमान झाला तर लगेच रेड फ्लॅग केला जातो. धार्मिक आधारावर वेगळ्या राज्याची मागणी केली तरीही ती पोस्ट रेड फ्लॅग होते.

तिसरं महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय चिन्हांचा अपमान. ती जळलेली दाखवणं, त्यावर स्टँप मारणं आक्षेपार्ह आहे.

सरकारकडून फेसबुक पोस्ट काढून टाकण्याची मागणी कमी झालीय

फेसबुक ट्रान्सपरन्सी रिपोर्टप्रमाणे फेसबुकवरची पोस्ट काढून टाकण्याची सरकारची मागणी कमी झालीय. 2015मध्ये सुमारे 30 हजार पोस्ट काढून टाकण्याची मागणी झाली होती. 2017मध्ये ही संख्या 3 हजारावर आलीय. 2015मध्ये भारताचा नंबर पहिला होता आता तो सातवा आहे.

दरम्यान जगभरातून फेसबुकनं स्वत:हूनच हेट स्पीच काढून टाकलंय. अशा पोस्ट 16 लाखांवरून 30 लाखांपर्यंत पोचल्यात. भारतात 3 कोटी फेसबुक युजर्स आहेत.

First published: January 17, 2019, 5:34 PM IST

ताज्या बातम्या