मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Washing Machine: चक्क टिफिनच्या आकाराची वॉशिंग मशिन, एकावेळी धुवू शकता एवढे कपडे

Washing Machine: चक्क टिफिनच्या आकाराची वॉशिंग मशिन, एकावेळी धुवू शकता एवढे कपडे

Portable Washing Machine: या पोर्टेबल वॉशिंग मशीनचं नाव टेक्नो ऑटोमॅटिक पोर्टेबल फोल्डेबल वॉशिंग मशीन आहे. हे मशिन फोल्ड करून टिफिन बॉक्सच्या आकाराचं बनते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 26 सप्टेंबर: आपल्याला आपल्या आयुष्यात दररोज अनेक प्रकारची कामं करावी लागतात. नोकरी आणि बाहेरच्या कामांव्यतिरिक्त घरातील कामंही करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, घर साफ करणं, स्वयंपाक करणं, कपडे धुणं इ. घरामधील दैनंदिन कामं नियमित करावी लागतात. ही कामं शक्यतो घरातील महिलांनाचा करावी लागतात किंवा काहीवेळा घऱातील सर्वजण मिळून घरातील कामं करतात, परंतु एकट्या राहणाऱ्या लोकांना ही कामं स्वतःच करावी लागतात. कपडे धुण्याबद्दल बोलायचं झाल्यास आजच्या काळात लोकांना हातानं कपडे धुवायला आवडत नाही. त्यामुळं ते वॉशिंग मशीन वापरणं अधिक पसंत करतात. पण वॉशिंग मशिन घरातील खूप जागा व्यापते आणि ती महागडीही असते. पण तुम्हाला कपडे धुण्यासाठी तुम्हाला मोठी वॉशिंग मशीन घेण्याची गरज नाही, कारण आज आम्ही तुम्हाला एका फोर्डेबल वॉशिंग मशीनबद्दल सांगणार आहोत. या खास वॉशिंग नेमकी कशी आहे, ती कसं काम करते आणि तिची किंमत काय आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

फोर्डेबल वॉशिंग मशीन काय आहे?

वास्तविक, या मशीनचं नाव टेक्नो ऑटोमॅटिक पोर्टेबल फोल्डेबल वॉशिंग मशीन आहे. ही मशिन फोल्ड करून टिफिन बॉक्सच्या आकाराचं बनते.

अशा परिस्थितीत तुम्ही हे मशिन घरी कुठेही ठेवून सहजपणे वापरू शकता. तसेच ही मशिन सोबत घेऊन जाऊ शकते, कारण तिचं वजनही जास्त नाही.

हेही वाचा: WhatsApp वर आता बुलेटच्या स्पीडनं शेअर होणार Document, लवकरच येणार नवं फीचर

टच कंट्रोल सिस्टीम:

या वॉशिंग मशीनमध्ये पूर्णपणे टच कंट्रोल सिस्टीम आहे, ज्यामुळे ती ऑपरेट करणं खूप सोपं आहे. त्याच वेळी, त्यात कपडे धुणंही अगदी सोपं आहे.

असे करते कार्य-

हे फोल्डेबल वॉशिंग मशीन एकावेळी 10 कपडे धुवू शकते. त्याच वेळी, या मशीनला कपडे एकदा धुण्यासाठी 15 मिनिटे लागतात.

किंमत किती आहे?

आता या छोट्या आणि सुलभ वॉशिंग मशीनच्या किंमतीबद्दल बोलूया. तुम्ही हे मशीन ऑनलाइन तसेच ऑफलाइन खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर ती तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकते.

First published:

Tags: Technology