सॅन फ्रान्सिस्को, 16 जून : अॅपलने (Apple) अमेरिकेत एका महिलेला लाखो रुपये दिले आहेत. या प्रकरणी तपासादरम्यान असं आढळलं, की आयफोन (iPhone) दुरुस्ती करणाऱ्या तंत्रज्ञांनी त्या महिलेच्या फोनवरुन तिच्या फेसबुक अकाउंटवर (Facebook Account) अश्लील कंटेंट अपलोड केला होता.
द टेलिग्राफच्या एका रिपोर्टनुसार, कॅलिफोर्नियात आयफोनची दुरुस्ती करण्यासाठी महिला गेली असता, तेथील दोन तंत्रज्ञांनी 2016 मध्ये ओरेगन कॉलेजच्या विद्यार्थी असलेल्या जेन डो यांच्या फोनवरुन अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केले होते. अॅपलने द वर्जला दिलेल्या विधानात या घटनेबाबत सांगतिलं होतं.
5 मिलियन डॉलरची मागणी -
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सांगण्यात आलं, की फोटो आणि व्हिडीओ अशा प्रकारे अपलोड केले होते की ज्याद्वारे असं सूचित होतं की जेन डो यांनी स्वत:चं ते पोस्ट केलं आहे. जेन डोच्या वकिलांनी अॅपलला भावनिक त्रासासाठी 5 दशलक्ष डॉलर्सची भरपाई मागितली होती. अॅपलने घटनेचा सखोल तपास करुन आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं.
आम्ही आमच्या ग्राहकांच्या डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता गंभीरपणे घेत आहोत. आणि दुरुस्तीच्या प्रक्रियेत डेटा सुरक्षित ठेवला जाईल याची खात्री करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रोटोकॉल आहेत. 2016 मध्ये ज्यावेळी आमच्या धोरणांच्या या गंभीर उल्लंघनाची जाणीव झाली तेव्हा त्वरित कारवाई केली, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.