मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

या दिवशी लाँच होणार बहुचर्चित Poco M3 Pro 5G स्मार्टफोन, पाहा फीचर्स आणि किंमत

या दिवशी लाँच होणार बहुचर्चित Poco M3 Pro 5G स्मार्टफोन, पाहा फीचर्स आणि किंमत

Poco M3 Pro 5G फोनला कंपनीच्या पोर्टफॉलियोमध्ये भारतातील पहिल्या 5G फोनच्या रुपात सादर केलं जाणार आहे.

Poco M3 Pro 5G फोनला कंपनीच्या पोर्टफॉलियोमध्ये भारतातील पहिल्या 5G फोनच्या रुपात सादर केलं जाणार आहे.

Poco M3 Pro 5G फोनला कंपनीच्या पोर्टफॉलियोमध्ये भारतातील पहिल्या 5G फोनच्या रुपात सादर केलं जाणार आहे.

नवी दिल्ली, 2 जून : Poco M3 Pro 5G स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता Poco M3 Pro 5G स्मार्टफोनची भारतातील लाँचिंग डेट (launching date) समोर आली आहे. हा फोन भारतात 8 जून रोजी लाँच होणार असल्याचं कंपनीने जाहीर केलंय. हा फोन जगभरात गेल्या महिन्यात लाँच झाला आहे. Poco चा एम 3 प्रो 5G फोन विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध असेल, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. पोको M3 प्रो 5G फोनला कंपनीच्या पोर्टफॉलियोमध्ये भारतातील पहिल्या 5G फोनच्या रुपात सादर केलं जाणार आहे. Flipkart वर फोनचं बॅनर लाईव्ह करण्यात आलं आहे. याचाच अर्थ हा फोन फ्लिपकार्ट एक्सक्लूझिव असेल. ग्लोबल लाँचिंगच्या (global launching) अंदाजावरून हा स्मार्टफोन 3 कलर ऑप्शनसह (color options) मार्केटमध्ये लाँच झाला आहे. यामध्ये पावर ब्लॅक, कूल ब्लू आणि पोको यलो कलर्सचा समावेश आहे. काय आहेत फीचर्स - - 6.5 इंची फुल एचडी+ IPS LCD स्क्रीन - 1080x2400 पिक्सल रेझॉल्यूश - डिस्प्ले पंच-होल डिझाईन - स्मार्टफोन डिस्प्ले 20:9 आणि रिफ्रेश रेट 90Hz - साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर - 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज - मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेट प्रोसेसर - 5000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट - वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एनएफसी, 5G, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C पोर्ट

(वाचा - WhatsApp Trick : डिलीट न करता असे हाईड करा तुमचे पर्सनल चॅट)

पोको ने लॉन्च डेट कंफर्म की है. ट्रिपल कॅमेरा - या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचे डेप्थ सेंसर दिले आहेत. तसंच सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा मिळेल.

(वाचा - चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास कसे मिळतील परत? ही आहे प्रोसेस)

किती असू शकते किंमत - कंपनीने हा फोन दोन व्हेरियंटमध्ये आणला आहे. 4 जीबी + 64 जीबी आणि दुसरा 6 जीबी +128 जीबी. याच्या 4 जीबी रॅम व्हेरियंटची किंमत भारतात जवळपास 14,200 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम व्हेरियंटची किंमत भारतात 16 हजार रुपये असेल, असा अंदाज आहे.
First published:

Tags: Smartphone, Tech news

पुढील बातम्या