मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Best Camera आणि 6 GB रॅम, Redmi ला टक्कर देणार Poco M2 फोन, जाणून घ्या फीचर्स

Best Camera आणि 6 GB रॅम, Redmi ला टक्कर देणार Poco M2 फोन, जाणून घ्या फीचर्स

चांगला कॅमेऱ्या आणि जास्त रॅमचा फोन हवा म्हटलं की बजेट कायम वाढतं

चांगला कॅमेऱ्या आणि जास्त रॅमचा फोन हवा म्हटलं की बजेट कायम वाढतं

चांगला कॅमेऱ्या आणि जास्त रॅमचा फोन हवा म्हटलं की बजेट कायम वाढतं

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 08 सप्टेंबर : चांगला कॅमेऱ्या आणि जास्त रॅमचा फोन हवा म्हटलं की बजेट कायम वाढतं आणि आपला फोन एक ते दोन वर्षाशिवाय जास्त टिकत नाही तो बदलायचाच होतो. अशावेळी आपण जरा बजेटमधले पण जास्त फीचर असणारे फोन घेण्याला प्राधान्य जास्त देतो. अशा ग्राहकांसाठी आज आज POCO ने स्वस्तात पण जास्त फीचर देणारा फोन लाँच केला आहे.

फ्लिपकार्डवर दुपारी 12 वाजता POCO M2 लाँच होणार आहे. ग्राहकांना हा फोन घेता येणार आहे. यासंदर्भात कंपनीने ट्वीट करून माहिती दिली आहे. तर पोकोच्या फोनचा लाँचिंग सोहळा दुपारी फेसबुकवर 12 वाजता पाहता येणार आहे. या फोनमध्ये काय फीचर्स मिळणार आणि साधारण किंमत काय असेल जाणून घ्या.

या फोनमध्ये आपल्याला 6 GB रॅम 5000 mAh बॅटरी मिळणार आहे. पूर्ण HD डिस्प्ले, व्हिडीओ आणि गेमिंगसाठी मोठी स्क्रीन, रॅम आणि दमदार बॅटरीदेखील मिळणार आहे.

हे वाचा-10 हजारापेक्षाही कमी किंमतीत आहे हा धमाकेदार फोन, मिळणार 4 कॅमेरे व HD+ डिस्प्ले

ही बॅटरी दोन दिवस चालेल असा दावा कंपनीने केला आहे. POCO M2 pro ची किंमत साधारण 13,999 तर M2 ची 10 हजारच्या आसपास असेल असं सांगण्यात येत आहे. हा फोन पंच होल कटआऊट असेल तर यामध्ये स्नॅपड्रॅगन 720G Soc मिळणार आहे. कॅमेऱ्याचा विचार करायचा झाला तर POCO M2 pro मोबाईलमध्ये 48+8+5+2 मेगापिक्सेल कॅमेरा मिळणार आहे. रेडमी नोट 8 प्रो मोबाईलला हा फोन टफ फाईट देईल असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Poco, Techonology, Xiaomi