मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

10 हजारहून कमी बजेट आहे? जबरदस्त बॅटरी, कॅमेरासह Poco C31 भारतात लाँच

10 हजारहून कमी बजेट आहे? जबरदस्त बॅटरी, कॅमेरासह Poco C31 भारतात लाँच

Poco ने भारतीय बाजारात आपला Poco C31 स्मार्टफोन लाँच केला आहे. 3 ऑक्टोबरपासून Flipkart Big Billion Days sale मध्ये फोन खरेदीसाठी उपलब्ध होणार होईल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : Poco ने भारतीय बाजारात आपला Poco C31 स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Poco C31 फोन वॉटर स्पेलेशिज रस्ट-प्रूफ पोर्ट्स प्रोटेक्शनह लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 3 ऑक्टोबरपासून Flipkart Big Billion Days sale मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

Poco C31 दोन कलर ऑप्शन Royal Blue आणि Shade Grey मध्ये खरेदी करता येईल. या फोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 48 टक्के ग्राहकांनी Poco C31 याच्या दमदार बॅटरीसाठी सर्वाधिक पसंत केला असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

फोनला 6.53 इंची vivid HD+ display आहे. फोन 3GB RAM आणि 32GB स्टोरेज आणि 4GB RAM आणि 64GB स्टोरेज अशा दोन वेरिएंटमध्ये लाँच केला आहे. फोनला फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचरही देण्यात आलं आहे.

Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन नाइट मोड कॅमेरासह लाँच, किती आहे किंमत

कॅमेरा -

Poco C31 ला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल, डेप्थ कॅमेरा 2 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी Waterdrop Style Notch देण्यात आला असून 5 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

50MP गिंबल कॅमेरासह Vivo X70 Pro+, X70 Pro भारतात लाँच, काय आहे किंमत

3GB RAM आणि 32GB स्टोरेज बेस वेरिएंटची किंमत 8499 रुपये आहे. तर 4GB RAM आणि 64GB टॉप वेरिएंटची किंमत 9499 रुपये आहे.

सेलमध्ये लाँचिंग ऑफरअंतर्गत बेस वेरिएंट 7999 रुपये आणि टॉप वेरिएंट 8999 रुपयांत खरेदी करता येईल. Poco C31 ई-कॉमर्स साइट Flipkart वर खरेदी करता येईल. Flipkart Big Billion Days 2021 sale मध्ये फोन बँक ऑफरमध्ये मिळेल. ICICI आणि Axis Bank ग्राहक फोनच्या खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत Instant Discount मिळेल.

First published:

Tags: Smartphone, Tech news